Laptop Cleaning Tips: आपल्यातील अनेक जण दिवसातील बहुतांश वेळ लॅपटॉपवर काम करत असतात. प्रोफेनशल आणि कॉर्पोरेटला लाईफमध्ये आपल्याला लॅपटॉपशिवाय पर्याय नाही. या स्क्रीनवर अनेकदा डाग पडतात किंवा भरपूर धूळ साचते. तात्पुरती एखाद्या फडक्याने ही धूळ पुसली की लॅपटॉप स्वच्छ झाला असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात लॅपटॉप अतिशय खराब असतो. त्याला हात लावून काम करतानाच काही वेळा आपण घाईत तसेच जेवतो.नकळत तोंडात बोट घालतो, यामुळे ही घाण कधी आपल्या पोटात जाते. म्हणून आपण दिवसभर ज्यावर काम करतो तो लॅपटॉप स्वच्छ असायला हवा.
लॅपटॉपच्या कीबोर्डवरील धूळ काढून टाकण्यासाठी आपण कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करतो परंतु, यामुळे लॅपटॉप खराब होण्याची अधिक शक्यता असते. असे केल्याने आपल्या लॅपटॉपचे काही संवेदनशील भाग खराब होऊ शकतात. शिवाय, लॅपटॉपच्या फॅनच्या ब्लेडला हानी पोहोचवू शकतो. तुम्ही घरच्या घरही तुमचा लॅपटॉप स्वच्छ करू शकता. तुम्हाला फार काही वेगळं करायची अथवा पैसे खर्च करून कुठू सर्व्हिस सेंटरमध्येही जाण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया की लॅपटॉप स्वच्छ करण्याच्या सोप्प्या टीप्स.
हेही वाचा – अजब गजब! जेल की ५ स्टार हॉटेल? चिकन, मासे, गुलाबजाम, जिलेबीसारखे मिळतात टेस्टी पदार्थ
लॅपटॉप स्वच्छ करण्याच्या सोप्प्या टीप्स –
- लॅपटॉप बंद करा आणि प्लगमधून पीन काढून ठेवा.
- हलक्या मायक्रोफायबरच्या कापडाने लॅपटॉप पुसून घ्या.
- आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर काही वेळा आपल्या हाताचे ठसे किंवा आणखी कसले डाग असतात. ते काढण्यासाठी अल्कोहोल असलेले एक लिक्वीड मिळते.
- ते कापडावर घेऊन त्याने स्क्रीन हळूवार पुसा. ब्लिचचा वापर करु नका.
- बारीक पेटिंग ब्रशसारखे ब्रशही मिळतात त्यानं तुम्ही लॅपटॉपच्या की-बोर्डला अडकलेली धुळही साफ करू शकता.
- यानंतर लॅपटॉप मोकळ्या हवेत ठेवून द्या.