गुगल फोटोचा वापर करून अनेकांना ऑनलाईन फोटो सेव्ह करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामध्ये युजर्स वेगवेगळे फोटो अनेक फोल्डर्स बनवुन सेव्ह करू शकतात. फोनमधील गॅलरीमध्ये आवश्यक, अनावश्यक अशा इतक्या फोटोंचा भडीमार होतो की ऐनवेळी एखादा फोटो सापडत नाही. अशावेळी गुगल फोटोमध्ये बनवलेले अल्बमची मदत होते. जर तुम्हाला गुगल फोटोमध्ये नवा अल्बम कसा बनवायचा याची माहिती नसेल, तर त्यासाठी पुढे दिलेल्या सोप्या स्टेप्सची मदत होईल.

या सोप्या स्टेप्स वापरून गुगल फोटोमध्ये तयार करा नवा अल्बम

आणखी वाचा: युट्यूब व्हिडीओमध्ये सबटायटल्स कसे अ‍ॅड करायचे? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • तुमच्या स्मार्ट फोन किंवा इतर डिव्हाईसमध्ये गुगल अ‍ॅप सुरू करा.
  • गुगल अकाउंटमध्ये साइन इन करा.
  • ज्या फोटोचा नवा अल्बम बनवायचा आहे त्यावर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करा.
  • ‘अ‍ॅड +’ यावर क्लिक करा.
  • त्यानंतर अल्बम निवडा आणि त्या अल्बमला हवे ते नाव द्या.
  • त्यानंतर ‘डन’ पर्यायावर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही गुगल फोटोमध्ये नवा अल्बम बनवु शकता.