Real Vs Fake Red Chilli Powder: लाल मिरची पावडर हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे, त्याशिवाय आपण अनेक स्वादिष्ट पदार्थांची कल्पना करू शकत नाही, भाज्या, मांसाहारी पदार्थ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये लाल मिरची पावडर वापरली जाते. आधीच्या काळात लाल मिरच्या बाजारातून विकत आणल्या जायच्या आणि मग त्या दगडाच्या गाळ्यात बारीक करून त्याची पावडर तयार केली जायची, पण सध्या वेळेअभावी लोक बाजारातूनच लाल मिरची पावडर विकत घेऊ लागले. बाजारात उपलब्ध असलेल्या या मसाल्यामध्ये भेसळ होण्याची भीती नेहमीच असते, त्यामुळे जेव्हाही खरेदी करायला जाल तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते.

लाल मिरची पावडरमध्ये या गोष्टींची भेसळ केली जाते

लाल मिरची पावडरच्या माध्यमातून जास्त नफा मिळविण्यासाठी अनेक व्यापारी भेसळ करतात. या मसाल्यामध्ये साधारणपणे ज्या गोष्टी जोडल्या जातात त्या पुढीलप्रमाणे आहेत-

  • कृत्रिम रंग
  • विटांचा भुसा
  • जुनी आणि खराब झालेली मिरची
  • चॉक पावडर
  • साबण
  • लाल वाळू

भेसळीच्या माध्यमातून मसाल्याला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न..

या गोष्टींची भेसळ केली जाते, विशेषत: कृत्रिम रंगांचा वापर करून हा मसाला दिसायला आकर्षक बनवला जातो, जेणेकरून बाजारातील लोक बघताच त्याची लगेच खरेदी करतात.

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रेल्वे स्थानकांची नावे ऐकून तुम्हालाही हसू येईल; मुंबईतील ‘या’ स्टेशनाचाही आहे सहभाग)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

FSSAI देखील बनावट लाल मिरची पावडर ओळखण्यासाठी जागरूक केले आहे

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने वेळोवेळी लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून बनावट मसाल्यांमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. चला तर मग जाणून घेऊया लाल मिरची पावडर खरी आहे की खोटी कशी ओळखायची..

बनावट केलेली मिरची पावडर कशी ओळखायची?

  • यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या.
  • नंतर त्यात १ चमचा लाल मिरची पावडर घाला.
  • पाण्यातून लाल मिरचीचे अवशेष तपासा.
  • हाताला चोळा आणि त्वचेवर खडबडीतपणा जाणवत असेल तर समजा त्यात विटांची पावडर मिसळली आहे.
  • जर ही पावडर तुमच्या हाताला साबणासारखी गुळगुळीत वाटत असेल तर समजून घ्या की त्यात साबण मिसळलेला आहे.