सोन्याचे दागिने खरेदी करताना त्याचे दर, शुद्धता याची नीट खात्री करूनच ते खरेदी केले जातात. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्यावरील हॉलमार्क पाहिले जाते. पण प्रत्येक दागिन्यांवर असणारे हॉलमार्क खरे असतेच नाही. काहीवेळा ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी खोटे हॉलमार्कही वापरले जातात, जे दिसायला खऱ्या हॉलमार्क सारखेच दिसतात. मग अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो. यावरील उपाय म्हणजे काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही हॉलमार्क खरा आहे की खोटा ते तपासू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉलमार्क खरा आहे की खोटा ओळखण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

  • सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्कवर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) चे चिन्ह असणे आवश्यक असते. हे चिन्ह त्रिकोणी असते.
  • धातुची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्कवरील कॅरेटेज (22K915) तपासा.
  • हॉलमार्कवर ज्वेलर्सचे चिन्ह, हॉलमार्किंग सेन्टरचे चिन्ह किंवा क्रमांक योग्य आहे का तपासणे आवश्यक असते.
  • त्या ज्वेलर्सचा आयडेनटीफिकेशन नंबर काय आहे ते शोधून, तो नंबर आणि हॉलमार्कवरील नंबर सारखा आहे का ते तपासा.
  • बीआयएस गाईडलाइन्सनुसार तुम्ही ज्वेलर्सचा पत्ता आणि त्यांच्या लायसन्सवरील पत्ता सारखा आहे का तपासणे गरजेचे आहे.
  • एसे हॉलमार्किंग सेंटरकडुन निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि तुमच्याकडुन आकरण्यात आलेली रक्कम सारखी आहे का हे तपासण्यासाठी नेहमी दागिने विकत घेतल्यानंतर त्याचे बिल घ्यावे.

आणखी वाचा: भारतात फक्त ‘या’ ठिकाणी चारही बाजूने येते रेल्वे; महाराष्ट्रातील जागेचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अशाप्रकारे या टिप्स वापरून तुम्ही हॉलमार्क खरा आहे की खोटा हे तपासू शकता. १६ जून, २०२१ पासून सरकारकडुन सर्व सोन्याच्या दागिन्यांवर आणि इतर मौल्यवान दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले. या आदेशानंतर त्वरित २५६ जिल्ह्यांमध्ये गोल्ड हॉलमार्किंग सुरू करण्यात आले जिथे आधीच सेंटर उपलब्ध होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify gold jewellery hallmark is original or fake use these simple tips to differentiate pns
First published on: 23-01-2023 at 16:39 IST