Link Pan To Aadhar Card : तुमचे पॅन आधारला जोडलेले नसल्यास हे काम लवकर पूर्ण करा. कारण आयकर विभागाने पॅन धारकांना पॅन आधार कार्डशी लिंक करण्याचा अंतिम इशारा दिला आहे. ताज्या पब्लिक अडव्हायजरीनुसार, ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन आधारशी जोडलेले नसल्यास पॅन निष्क्रिय होईल. या तारखेनंतर पॅनशी जोडलेले आर्थिक व्यवहार बंद होतील. इतकेच नव्हे तर, सर्व प्रलंबित आयकर परताव्याची प्रक्रिया थांबवली जाईल.

या नागरिकांना सूट

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार

काही नागरिकांना पॅन आधारला जोडण्याच्या प्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे. जी व्यक्ती आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय या राज्यांत राहाते तिला सूट आहे. त्याचबरोबर, आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी, मागील वर्षात ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती, भारताचे नागरिक नसलेले, अशा व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.

(४० कोटी Twitter युजर्सचा डेटा विक्रीला, गुगलच्या सीईओसह ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याचाही समावेश)

शुल्क

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून पॅनला आधार जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२३ करण्यात आली होती. मात्र, पॅन आधार जोडणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी लोकांना १००० रुपये शुल्क द्यावे लागेल. आयटी विभागाच्या अडव्हायझरीनुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन आधारशी जोडले नसल्यास पॅन नंबर निष्क्रिय होईल.

आधारशी असे जोडा पॅन

तुम्ही पॅन आधार जोडणी ऑनलाइन किंवा नोंदनीकृत मोबाईल क्रमांकावरून ५६७६७८ किंवा ५६१६६१ वर एसएमएस करून करू शकता. आयकर विभागाच्या पोर्टलला भेट देऊन आणि लेट फी देऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पॅनला आधार ऑनलाइन पद्धतीने लिंक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(नवीन फीचर्स मिळणार नाहीच, सुरक्षाही वाऱ्यावर; ३१ डिसेंबरपासून Whatsapp ४९ स्मार्टफोनमध्ये काम करणार नाही)

आधारशी असे जोडा पॅन

तुम्ही पॅन आधार जोडणी ऑनलाइन किंवा नोंदनीकृत मोबाईल क्रमांकावरून ५६७६७८ किंवा ५६१६६१ वर एसएमएस करून करू शकता. आयकर विभागाच्या पोर्टलला भेट देऊन आणि लेट फी देऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पॅनला आधार ऑनलाइन पद्धतीने लिंक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • incometax.gov.in/iec/foportal/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  • क्विक लिंक सेक्शनमध्ये जा आणि लिंक आधार पर्यायावर क्लिक करा.
  • आता नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक एन्टर करा.
  • आय व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स पर्यायावर क्लिक करून भरलेली माहिती सत्यापित करा.
  • कंटिन्यूवर क्लिक करा.
  • आता नोंदनीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एन्टर करा.
  • पेनल्टी शुल्क भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.