देशात सेकंड हँड वाहन विक्रीचे प्रमाण वाढले आहे. सेकंड हँड वाहनांची किंमत कमी असल्याने ग्राहकांची मोठी बचत होते. सेकंड हँड वाहन विकल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुचाकीची मालकी हस्तांतरीत करणे. आता अनेक प्रक्रिया ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे, अनेक राज्यांमध्ये दुचकीची मालकी हस्तांतरित करता येऊ शकते. दुचाकीची मालकी हस्तांतरित करायची असल्यास तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता. ही प्रक्रिया प्रत्येक राज्यासाठी वेगळी असू शकते.

या कागदपत्रांची गरज

वानाची मालकी हस्तांतरित करण्यासाठी तुमच्याकडे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, अ‍ॅड्रेस प्रुफ, फॉर्म, २८, ३०, २९ आणि ३१ असणे गरजेचे आहे. वाहन बँकेकडे गहाण असल्यास फॉर्म ३५ लागेल. परिवहन संकेतस्थळावर नोंदणीकृत फोन क्रमांकासह खाते असणे गरजेचे आहे. फोन क्रमांकावर संकेतस्थळाकडून ओटीपी पाठवण्यात येते, त्यामुळे फोन क्रमांक संकेतस्थळाशी जोडलेले असणे गरजेचे आहे.

(सीएनजी वाहनाची ‘अशी’ करा देखभाल, सुरक्षित होईल प्रवास, इंजिनलाही होणार नाही नुकसान)

असे करा हस्तांतरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • परिवहन खात्याच्या संकेतस्थळावर जा आणि ‘ऑनलाइन सर्व्हिसेस निवडा’.
  • यानंतर ‘वेहिकल रिलेटेड सर्व्हिसेस’ निवडा आणि नंतर राज्य निवडा. त्यानंतर वाहनाचे नोंदणी क्रमांक आणि चेसी नंबर द्या. त्यानंतर तुम्हाला योग्य अर्ज निवडा लागेल.
  • संकेतस्थळ वाहनाचा वर्तमान मालक आणि नव्या मालकाची माहिती मागते. त्यानंतर आधार कार्ड आणि ओटीपीच्या माध्यमातून पडताळणी होते.
  • यानंतर शुल्क भरावे लागते आणि पावती मिळते.

काही राज्यांमध्ये आरटीओ नवीन नोंदणी प्रमाणपत्र वाहनाच्या नव्या मालकाच्या पत्त्यावर पाठवते, तर काही राज्यांमध्ये व्यक्तीला स्वत: आरटीओला भेट द्यावे लागू शकते. हे सर्व राज्यांनुसार वेगळे असू शकते.