आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या युएईत सुरु आहे. १९ सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा आता मध्यावधीकडे झुकली आहे. प्रत्येक संघ गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवण्याची धडपड करतो आहे. अनेक संघांनी यंदा अनपेक्षित कामगिरी करत पहिल्या चार स्थानांवर झेप घेतली आहे, तर चेन्नईसारखा दादा संघ यंदा गुणतालिकेत खाली फेकला गेला आहे. आतापर्यंत अनेक गुणवान खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईकर अजिंक्य रहाणे दिल्लीच्या संघात राखीव खेळाडूंच्या बेंचवर बसून असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींमध्ये Mid Season Transfer ची चर्चा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रीडा जगतात लिग कल्चरमध्ये Mid Season Transfer ही संकल्पना राबवली जाते. एखाद्या स्पर्धेचा हंगाम मध्यावर आल्यानंतर दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या संमतीने खेळाडूला विश्वासात घेऊन खेळाडूंची देवाण-घेवाण करुन शकतात. इंग्लिश प्रिमीअर लिग आणि युरोपियन फुटबॉल स्पर्धांमध्ये अनेक मान्यवर संघ या सुविधेचा फायदा घेत संघात नवीन खेळाडूंना जागा देतात. आयपीएलच्या गेल्या हंगामातही गव्हर्निंग काऊन्सिलने Uncapped Player साठी Mid Season Transfer ची सोय केली होती. पण मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता एकही संघ यासाठी पुढे आला नाही. यंदाच्या हंगामात गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडू भारतीय असो किंवा परदेशी हंगाम मध्यावर आल्यानंतर Mid Season Transfer ची सोय केली आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 mid season transfer rules eligibility for players available players and all you need to know psd
First published on: 07-10-2020 at 17:40 IST