मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल आणि त्यामधील प्रवाशांची गर्दी. दिवसेंदिवस तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि नागरिकांना त्यांचं जीवन सुखकर आणि आरामदायी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रोचं जाळ पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी मेट्रो धावतेयसुद्धा. अशीच मेट्रो मुंबईतदेखील सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे. आज आपण मुंबईतील अशाच एका मेट्रो स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत, जे तब्बल अर्धा किलोमीटर लांबीचे जगातील सर्वात मोठे मेट्रो स्टेशन आहे.

मुंबई मेट्रो ३ चा सुमारे तीन किलोमीटरचा बीकेसी ते धारावी स्टेशनपर्यंतचा मार्ग हा मिठी नदीच्या खालून जातो. दुतर्फा जाणारा १.५ किलोमीटर्सचा हा मार्ग भूगर्भात तयार करताना विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले; तर भूमिगत मेट्रो मार्ग ३, सिप्झ ते कफ परेड जाणाऱ्या या मार्गातील सिप्झ ते बीकेसी, वांद्रे हा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. बीकेसी स्टेशन हे जंक्शनप्रमाणे काम करणार आहे. जिथे मार्ग बदलण्याची आणि गाड्या पार्क करण्याची सोयदेखील असणार आहे. त्यामुळे हे स्टेशन तब्बल अर्धा किलोमीटर लांबीचे बनविण्यात आले असून ते भारतातील सर्वात लांब आणि जगातील मोजक्या सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक ठरले आहे. तर या ‘मेट्रो मार्ग ३’ च्या या अनोख्या स्टेशनची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती जाणून घेऊया.

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हेही वाचा- रेल्वेतील स्लीपर, एसी कोचबद्दल आपण ऐकलं असेल पण हे ‘एम’ कोच काय आहे? 

सुयश त्रिवेदी कार्यकारी संचालक (सिव्हिल), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी लोकसत्ताशी बोलताना या ‘मेट्रो मार्ग ३’ च्या अनोख्या स्टेशनबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसीमधील हे स्टेशन भारतातील सर्वात मोठं आणि जगातील सर्वाधिक लांबीच्या स्टेशन्सपैकी एक असणार आहे. तसेच या स्टेशनवर अनेक गाड्या येऊन त्या टर्मिनेट होऊन मागे जाणार आहेत, त्यामुळे हे स्टेशन एखाद्या जंक्शनप्रमाणे काम करणार आहे.

जवळपास अर्धा किलोमीटर लांबीचं स्टेशन –

रेल्वेच्या स्टेशनची लांबी जवळपास ४७५ मीटर आहे, तर इतर मेट्रोची स्टेशनं ही साधारणपणे २०० ते २५० मीटरची असतात, असंही त्रिवेदी यांनी यावेळी सांगितलं. या स्टेशनसाठी वेगवेगळे टनेल तयार करण्यात आले असून ते बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन हे स्टेशन बनविण्यात आलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे येथील बोगद्यातून दोन रेल्वे एकाच वेळी जाऊ शकतात. तसेच बीकेसी स्टेशन बनविताना प्रवाशांना जास्त चालावं लागणार नाही, त्यांना रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही याची काळजीदेखील घेण्यात आल्याचं त्रिवेदी यांनी सांगितलं.

दोन गाड्या एकाच वेळी पार्क करता येणार :

या स्टेशनमध्ये दोन रेल्वे एकत्र पार्क केल्या जाऊ शकतात. तसेच या स्टेशनमध्ये अनेक ठिकाणांहून येणाऱ्या गाड्यांच्या मार्गिका एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. शिवाय प्रवाशांना एकदा मेट्रो स्टेशनमध्ये आल्यानंतर तिथून बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, यासाठी सर्व गाड्या जोडल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावर बुलेट ट्रेनचे स्टेशन आहे. भविष्यात बीकेसी स्टेशन आणि बुलेट ट्रेन जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारची योजना आखली आहे. दरम्यान, या स्टेशनचं काम प्रगतिपथावर असून लवकरच काही महत्वाच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर या मार्गावरून मेट्रो धावायला सुरुवात होणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.