भारतीय रेल्वेतून प्रवास करताना तिकिट खरेदी करणं आवश्यक असतं. तिकिटशिवाय प्रवास केल्यावर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. अनेक वेळ असं होतं की, प्रवासी तिकिट काढतात पण काही कारणामुळं तिकिट हरवतं. तिकिट हरवल्यानंतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. तिकिट विसरल्यावर किंवा रिजर्वेशन तिकिट हरवल्यावर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करु शकता. अशा परिस्थितीत तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असल्यावर दंड भरावा लागतो का? जाणून घेऊयात अशा परिस्थितीत रेल्वेचे नियम काय आहेत.

डुप्लीकेट तिकिट बनवावं लागेल

तिकिट हरवल्यावर डुप्लीकेट तिकिट बनवून प्रवास करु शकता. वेगवेगळ्या श्रेणीसाठी डुप्लीकेट तिकिट बनवण्याचे नियम आणि फी वेगवेगळी आहे. तुम्ही डुप्लीकेट तिकिट बनवू शकता किंवा तिकिट काउंटरवर डुप्लीकेट तिकिट बनवून घेऊ शकता.

इतके पैसे लागणार

भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर डुप्लीकेट तिकिट बनवण्याची प्रक्रिया सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. सेकेंड आणि स्लीपर क्लासचा डुप्लीकेट तिकिट बनवण्यासाठी तुम्हाला ५० रुपये द्यावे लागतात. यांच्या वरच्या श्रेणीसाठी रेल्वे १०० रुपये शुल्क घेते. जर रिझर्वेशन चार्ट बनवल्यानंतर कंफर्म तिकिट हरवल्यास डुप्लीकेट तिकिट बनवण्यासाठी ५० टक्के किराया भरावा लागतो.

नक्की वाचा – सफारी वेहिकलमध्ये असलेल्या माणसांवर सिंह हल्ला करत नाहीत, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

तिकिट फाटलं तर…?

तिकिट कंफर्म झाल्यानंतर फाटलं, त्यावेळी डुप्लीकेट तिकिट बनवण्यासाठी तुम्हाला किरायाचे २५ टक्के नुकसान होऊ शकतं. वेटिंग लिस्टची फाटलेली तिकिट हरवल्यास डुप्लीकेट तिकिट बनवता येऊ शकत नाही. जर हरवलेलं ओरिजिनल तिकिट सापडलं, तर तुम्ही ट्रेन सुरु होण्याआधी दोन्ही तिकिट रेल्वे काउंटरवर दाखवून डुप्लीकेट तिकिटाला दिलेले पैसे परत घेऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लॅटफॉर्म तिकिट असल्यास प्रवास करु शकता?

जर एखाद्या कारणामुळं तुम्हाला तिकिटशिवाय प्रवास करावा लागल्यास, अशावेळी प्लॅटफॉर्म तिकिट खूप महत्वाची ठरते. तुम्ही ट्रेनमध्ये असणाऱ्या टीटीईला संपर्क करुन तिकिट बनवू शकता. किरायासोबतच तुम्हाला पेनल्टीसाठी पैसे भरावे लागतील. जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकिट असेल, तरच टीटीई तुम्हाला तिकिट बनवून देईल. जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकिट असेल, तर विनातिकिट पकडल्यावर तुमच्याकडून दंड घेतला जाणार नाही.