अनेक आर्थिक व्यवहार सध्या ऑनलाईन होत असले तरी काहीजण आजही चेकचा वापर करतात. चेकमुळे रक्कम स्वत:कडे न ठेवता अनेक मोठे व्यवहार करता येतात. पण चेक दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी आपल्याला त्यावर त्या व्यक्तीचे नाव, योग्य तारीख, रक्कम टाकल्यानंतर स्वाक्षरी करावी लागेत. चेकवरील स्वाक्षरी हा महत्वाचा भाग असतो. याशिवाय आणखी एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे चेकच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दोन तिरक्या रेषा मारव्या लागतात. पण या रेषा का मारल्या जातात तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया याचा अर्थ आणि महत्त्व

आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचा चेक अनेकदा महत्वाचा असतो. बँकेकडून ग्राहकाला चेकबुक दिले जाते. यात अनेकदा दुसऱ्या चेक देताना त्यावर दोन तिरप्या रेषा मारल्या जातात. या दोन रेषांमुळे चेकच्या व्यवहाराचे स्वरुप पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे चेकवर नेहमी विचार करुनचं या रेषा मारयला हव्यात. नाही तर चेक देणाऱ्या व्यक्तीला अडचण येऊ शकते. ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यायचे आहे त्यांच्यासाठी या रेषा काढल्या जातात, या रेषांचा अर्थ तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने चेक काढला आहे त्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जावेत.

Cheque Bounce Rules: तुम्हाला दिलेला चेक बाऊन्स झाल्यास काय कराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

पण ज्या व्यक्तीला चेक दिला आहे त्याला आधी त्याच्या अकाउंमध्ये तो डिपॉझिट करावा लागतो. त्यानंतर खात्यातून पैसे काढावे लागतात. म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम तुम्ही चेकवर लिहिलेल्याच व्यक्तीच्या खात्यात जमा व्हावे असे वाटत असेत तर तुम्ही या दोन रेषा मारू शकता.

या दोन रेषा काढल्यानंतर बरेच लोक त्यात Account Payee किंवा A/C Payee देखील लिहितात. त्यामुळे चेकचे पैसे संबंधित खात्यातच जमा करायचे असल्याचे स्पष्ट होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेक घेणारी करणारी व्यक्ती जेव्हा तो बँकेत जमा करते तेव्हा त्याला ही रक्कम रोख स्वरूपात मिळण्याऐवजी थेट खात्यात मिळते. पण एखाद्या व्यक्तीचे बँक अकाउंट नसेल अथवा त्याला तातडीने पैशांची गरज नसेल तर या रेषा मारणे टाळले पाहिजे.