Why Is Tonight’s Full Moon Called Snow Moon Or Hunger Moon: आज, २४ फेब्रुवारीला माघ महिन्यातील पौर्णिमा आहे. आजच्या दिवशी आकाशात दिसणाऱ्या चंद्राला स्नो मून किंवा हँगर मून असे संबोधले जाते. असं म्हणण्याचं नेमकं कारण काय हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मुळात पौर्णिमा म्हणजे काय हे पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर, चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. चंद्र स्वतः चमकत नसल्याने तो सूर्यापासून निघणारा प्रकाश परावर्तित करतो. चंद्राचे एकूण आठ टप्पे आहेत ज्यात अमावस्या, वॅक्सिंग क्रेसेंट, फर्स्ट क्वार्टर, वॅक्सिंग गिबस, पौर्णिमा, क्षीण गिबस, थर्ड क्वार्टर आणि क्षीण चंद्रकोर यांचा समावेश आहे. हे चक्र दर २९.५ दिवसांनी पुन्हा सुरु होत असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते.

स्नो मून म्हणजे नेमकं काय? असे नाव का पडले?

मूळ अमेरिकन जमातींनी या चंद्राला ‘स्नो मून’ / ‘हंगर मून’ असे नाव दिले होते. हिवाळ्यात प्रचंड थंडीच्या महिन्यात उद्भवलेल्या भयंकर स्थितीचे वर्णन करताना या पौर्णिमेच्या चंद्राला असे नाव देण्यात आले होते. नासाने दिलेल्या माहितीनुसार, भयंकर थंडीत जेव्हा हा चंद्र उगवत असे तेव्हा प्रचंड बर्फवृष्टीमुळे शिकार करणे कठीण होत असे म्हणूनच याला स्नो मून असे संबोधले जायचे. या काळात शिकार शक्य न झाल्याने अनेकदा उपासमार होत असे म्हणून याला हंगर मून म्हणजे भुकेचा चंद्र सुद्धा म्हटले जात होते.

स्नो मून विविध साधारणतः विविध नावांनी ओळखला जातो. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, दक्षिण कॅरोलिनामध्ये, मूळ अमेरिकन लोक याला ‘पहिला फ्लॉवर मून’ म्हणतात, वसंत ऋतूचा उत्तरेकडे सुरू होण्याचा हा संकेत मानला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशान्य किनाऱ्यावर फेब्रुवारी हा सर्वात जास्त हिमवर्षाव होणार महिना आहे, तर मध्य मैदानी भागात जानेवारीला सर्वाधिक बर्फवृष्टीचा महिना म्हणून ओळखले जाते. मात्र या वर्षी, पूर्व युनायटेड स्टेट्सच्या बऱ्याच भागांमध्ये बर्फाचा अभाव लक्षात घेता स्नो मून हा फक्त नावापुरताच स्नो मून ठरणार आहे दिसतेय.

आपण स्नो मून कधी पाहू शकतो?

स्पेस.कॉमच्या माहितीनुसार, स्नो मून यंदा शुक्रवारी २३ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून दृश्यमान झाला आहे. तर स्नो मून शनिवारी (पूर्व वेळेनुसार/ ईस्टर्न स्टॅंडर्ड टाइमझोननुसार) सकाळी ७:३४ म्हणजे भारतात संध्याकाळी ६ वाजल्यापासून दिसू शकतो. शनिवारी, पूर्वेकडील आकाशात क्षितीजाच्या जवळ आकाशात चंद्रासह शुक्र आणि मंगळाचे सुद्धा दर्शन होऊ शकते.