Maharashtra Budget Session Update: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. बजेटमध्ये सामन्य नागरिक, महिला व विविध जातींसाठी विविध सवलती व तरतुदी समाविष्ट करून सरकारने वर्ष २०२३- २४ साठी तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पतील महसुलाची आकडेवारी (Maharashtra Budget Pointers)

देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्याच्या कर्जात १०. ६४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत ४, ४९, ५२२ कोटी इतका महसुल जमा आहे तर येत्या वर्षासाठीचा खर्च हा ४, ६५, ६४५ कोटी इतका अपेक्षित आहे. याशिवाय राजकोषीय तूट ९५, ५०० कोटींची असून एकूण ऋण ७, ०७, ४७२ कोटी इतकी आहे. या एकूण आकड्यांनुसार यंदा महाराष्ट्र सरकारने १६ हजार १२२ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आता हा तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय व याशिवाय बजेटचे अन्य दोन प्रकार कोणते असतात हे आपण जाणून घेऊया..

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

तुटीचा अर्थसंकल्प

जेव्हा एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात अंदाजे खर्च अंदाजित महसुलापेक्षा जास्त असतो तेव्हा अर्थसंकल्प तुटीत असतो असे म्हटले जाते. या प्रकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सरकारकडे जमा होणारा महसूल खर्चापेक्षा कमी आहे.

शिलकी अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.

शून्य/ समतोल अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात जेव्हा खर्च व उत्पन्न यांच्यामध्ये समतोलता साधलेली असते तेव्हा त्याला समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.

दरम्यान, बजेटवरून विरोधकांनी एकनाथ शिंदेंच्या सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली असून हा केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचे म्हंटले आहे.