Pune Cheapest Shopping Market : पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनासाठी येतात. जर तुम्ही पुणे-मुंबईचे रहिवासी असाल किंवा पुण्याला भेट देण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पुण्यातील शॉपिंग स्ट्रीट्स एकापेक्षा एक दर्जेदार कलेक्शन आणि स्वस्त किमतीसाठी ओळखले जाते. पुण्यातील शॉपिंग स्ट्रीट्सवर गेल्यानंतर तुम्हाला कपड्यांपासून कॉस्मेटिकपर्यंत, ज्वेलरीपासून घरगुती रंग सजावटीपर्यंत कमी किमतीत सर्व खरेदी करता येऊ शकते.

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास
do you drink sugarcane juice in summer
Sugarcane : उन्हाळ्यात उसाचा रस पिताय? जाणून घ्या, उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

आज आम्ही तुम्हाला पुण्यातील स्वस्तात मस्त खरेदी करण्यासाठी काही बेस्ट ठिकाणे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या ती ठिकाणे :

फॅशन स्ट्रीट

फॅशन स्ट्रीट हे नवनवीन फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखले जाते. पुण्यातील या फॅशन स्ट्रीटवर तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न ड्रेस खूप कमी किमतींमध्ये मिळू शकतात. या मार्केटमध्ये विक्रेत्यांचे जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.

हेही वाचा : शेतात पैसे पेरले तर पैशांचे पीक येते? व्हायरल होण्यासाठी अजून काय काय करणार… हा व्हिडीओ एकदा पाहाच …

जुना बाजार

जर तुम्हाला घर सजवायचे असेल, तर तुम्ही जुना बाजारमध्ये जा. या बाजारात तुम्हाला ट्रेंडी अँटिक वस्तू खरेदी करता येतील. स्वस्तात मस्त खरेदीसाठी हे बेस्ट मार्केट आहे. येथे एकापेक्षा एक दर्जेदार पद्धतीची ज्वेलरीसुद्धा मिळते.

हॉंगकॉंग लेन

हॉंगकॉंग लेनमध्ये तुम्हाला कपडे, फूटवेअर, हँडबॅग, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती वस्तू खूप कमी किमतीत मिळू शकतात. वस्तूंच्या कमी किमतींमुळे हे मार्केट महाराष्ट्रभरात फेमस आहे. जर तुम्ही पहिल्यांदा पुण्यात आला असाल, तर हॉंगकॉंग मार्केटला अवश्य भेट द्या.

हेही वाचा : Mumbai Cheapest Shopping Market : मुंबईचं सर्वांत स्वस्त मार्केट; येथे करा स्वस्तात मस्त मनसोक्त खरेदी

तुळशी बाग

तुळशी बाग हे पुण्यातील सर्वांत जुने मार्केट आहे. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. जर तुम्हाला रेडीमेड गार्मेंट्सची खरेदी करायची असेल, तर तुळशी बागला नक्की भेट द्या. आर्टिफिशियल ज्वेलरी असो की कपडे, फूटवेअर असो की घरगुती वस्तू; येथे तुम्हाला स्वस्त किमतीत सर्व काही मिळू शकेल.