Sperm Whale Vomit : जगभरात भ्रमंती करणारी माणसं प्रवासादरम्यान उलट्या करतात. रस्त्यावरून जात असताना, ट्रेनमध्ये किंवा एखाद्या वाहनातून प्रवास करत असताना काही लोक उटली करतात. हे पाहून शेजारी असलेली काही माणसं तोंडाला रुमाल बांधतानाही प्रवासादरम्यान दिसत असतात. पण व्हेलसारख्या माशाने उटली केली की माणसांचं नशीब पालटायला वेळ लागत नाही. कारण स्पर्म व्हेल माशाची उलटी बाजारात विकली जाऊ शकते, याची कल्पनाही कुणाला नसेल. पण हे सत्य आहे.

तुम्ही आतापर्यंत प्राण्यांच्या तस्करीबद्दल ऐकलं असेल की, प्राण्यांची हाडे, दात, खाल आणि त्यांच्या शरीरातील महत्वाते अवयव बाजारात अवैधरित्या विकले जातात. हत्तीचे दात, गेंड्याची शिंगे आणि अन्य प्राण्यांच्या कातड्यांची किंमत बाजारात खूप जास्त असते. पण स्पर्म व्हेल माशाची उलटी कोट्यावधीं रुपयांना विक्री केली जाते. व्हेल माशाची उलटी अवैधपणे विकणाऱ्या तस्करांवर अनेकदा कारवाई झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. परंतु, कोट्यावधी रुपयांना विक्री होत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची खासीयत नक्की काय आहे? यामागचं कारून जाणून घ्या.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीला मागणी का असते?

बाजारात व्हेल माशाच्या उलटीची किंमत सोने-चांदीच्या किमतीहून अधिक आहे. म्हणजेच व्हेल माशाची उलटी कोट्यावधी रुपयांना विकली जाते. कारण परफ्युम बनवणाऱ्या कंपनी व्हेल माशाच्या उलटीची मागणी करतात. कंपनी व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग परफ्युमला सुंगधित आणि दिर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी करत असते. याचा वापर करून बनवलेलं परफ्युम शरीरावर लावण्यासाठीही उपयुक्त ठरतो. याच कारणामुळे कंपनी या माशाची उलटी कोट्यावधी रुपयांना खरेदी करत असल्याचं समजते. परफ्युमशिवाय व्हेल माशाची उलटी महागडी औषधं बनवण्यासाठीही वापरतात. तसेच दारु आणि सिगारेट बनवण्यासाठीही या उलटीचा वापर केला जतो.

व्हेलच्या उल्टीला काय म्हणतात ?

शास्त्रज्ञ व्हेल माशाच्या उलटीला ‘एम्बरग्रीस’ म्हणतात. स्पर्म व्हेल माशाची उटली कोट्यावधी रुपयांना विकली जाते. स्पर्म व्हेल माशाच्या उलटीला तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. कारण व्हेल मासा क्वचितच समुद्र किनारी येतो आणि या माशाची उलटी दिर्घकाळ समुद्राच्या पाण्यावर तरंगत असते. ही उलटी काळ्या रंगाच्या पदार्थासारखी असते.