मद्यपान करताना नेहमी ‘पेग’ हा शब्द वापरला जातो. पेग हे ३० किंवा ६० मिली या प्रमाणात मद्य मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. पेग हा शब्द का वापरला जातो याबाबत मागील लेखात आपण जाणून घेतले. आता या लेखात आपण ‘पटियाला पेग’ म्हणजे काय याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. मद्यपान करणाऱ्यांमध्ये नेहमी ‘पटियाला पेग’ची जोरदार चर्चा होत असते आहे. यावर बॉलिवूडमध्ये काही गाणीही तयार झाली आहेत. ‘पटियाला पेग’ सामान्य पेगपेक्षा आकाराने मोठा असतो. एक पटियाला पेग घेतला तरी अधिक नशा चढते, असा मद्यपान करणाऱ्यांचा दावा आहे. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटते की, पंजाबमधील एका शहराचे नाव मद्याच्या मोठ्या पेगला का दिले असावे? याबाबत फार कमी लोकांना माहित आहे, पटियाला पेगच्या नावामागील गोष्ट काय आहे? ते जाणून घेऊ या

cnbctv18ने दिलेल्या वृत्तानुसार, पटियाला पेगमध्ये १२० मिलीपर्यंत मद्य असू शकते. बहुतेक यासाठी व्हिस्कीसाठी हे प्रमाण वापरले जाते आहे. हे मुळात करंगळी आणि तर्जनी यांच्यातील अंतराने मोजले जाते. समजले नाही? पटियाला पेग ओतण्यासाठी, काचे ग्लासच्या बाहेरून तळाशी करंगळी ठेवावी लागेल आणि त्यानंतर तर्जनीपर्यंत व्हिस्की ओतणे आवश्यक आहे.

पटियालाच्या राजाच्या हुशारीमुळे सुरू झाला ‘पटियाला पेग’

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पटियाला पेगच्या नावाचा संबध पटियाला संस्थानाचे राजा भूपेंद्र सिंह यांच्याशी आहे. ते एक शीख राजा होते, ज्याचा कार्यकाळ १९०० ते १९३८ पर्यंत होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी सैनिक (१९६३ ते १९६६) कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही त्यांच्या अधिकृत चरित्रात ‘कॅप्टन अमरिंदर सिंग: द पीपल्स महाराजा’ यामध्ये पटियाला पेगचा राजा भूपेंद्र सिंग यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले आहे. राजा भूपेंद्र सिंग हे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे आजोबा होते. कॅप्टनचे वडील यादवेंद्र सिंह हे पटियाला संस्थानाचे शेवटचे महाराज होते.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात पटियाला पेगच्या नावाची गोष्ट सांगितली आहे. राजा भूपेंद्र सिंह यांनी शीख योद्ध्यांचा पोलो संघ तयार केला होती. हा संघ अतिशय उत्तम होता. राजा भूपेंद्रसिंगचा संघ ज्याच्याबरोबर सामना खेळत असे त्याचा पराभव निश्चित होता.

हेही वाचा – ‘पेग’ म्हणजे काय? मद्य ३०,६० आणि ९० मिली या प्रमाणातच का मोजले जाते? जाणून घ्या कारण…

इंग्लडच्या संघाने दिले होते राजा भूपेंद्रसिंग यांच्या संघाला आव्हान

एकदा भूपेंद्र सिंग यांच्या संघाला इंग्लडच्या संघाने त्यांच्याशी स्पर्धा करण्यास सांगितले. घोड्यावर बसून हा खेळ खेळावा लागत असे. पण तो पोलो नव्हता. खेळाचे नाव ‘Pegging the tent’ असे होते. या खेळात घोड्यावर स्वार झालेल्या खेळाडूला जमिनीवर पडलेल्या लाकडी ठोकळ्याला भाल्याच्या टोकाने मारावे लागते. पटियालाच्या राजाच्या संघाला या खेळाचा अनुभव नव्हता. प्रथमच भूपेंद्र सिंगच्या संघाला पराभवाची भीती वाटत होती कारण इंग्लड संघ या खेळात निष्णात होता.

सामना जिंकण्यासाठी राजाने लढवली शक्कल

भूपेंद्रसिंगने सामना जिंकण्याची योजना आखली. सामन्याच्या एक दिवस आधी, संध्याकाळी त्याने आपल्या सर्व पाहुण्यांना एक पार्टी दिली, ज्यामध्ये भरपूर मद्यपान उपलब्ध केले होते. राजाच्या आज्ञेप्रमाणे मद्याचे पेग दुप्पट मोठ्या प्रमाणात दिले जात होते. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्लड संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्यांना हँगओव्हर झाला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की, तो खेळात आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. तो सामना त्यांचा संघ हरला.

हेही वाचा – घरात मद्याच्या किती बाटल्या ठेवता येतात? महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय आहेत नियम, घ्या जाणून

मोठ्या पेग तक्रार भूपेंद्र सिंग यांच्यापर्यंत पोहोचली

दुःखी आणि संतापलेल्या इंगल्डच्या संघाने राजा भूपेंद्र सिंह यांच्याकडे याची तक्रार केली. मोठ्या पेगची तक्रार करण्यासाठी संघाने आपल्या राजकीय एजंटला पटियालाच्या राजाकडे पाठवले. राजा भूपेंद्र सिंह यांनी इरित संघाच्या एजंटला उत्तर दिले की, “पटियालामध्ये मोठे पेग बनवले जातात.” अशाप्रकारे पटियाला पेगचे नाव ‘पटियाला पेग’ ठेवण्यात आले. या कथेशिवाय, पटियाला पेगच्या नावाच्या काही किस्से आहेत, पण त्या सर्वांमध्ये एक नाव नेहमी असते ते म्हणजे पटियालाचा राजा भूपेंद्र सिंह. व्हिस्कीप्रेमी भारतीयांमध्ये ‘पटियाला पेग’ अजूनही खूप प्रसिद्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.