Highest Number Of Rivers: डोंगर, दऱ्या, समुद्र, धबधबे यांमुळे निसर्गाचे सौंदर्य वाढते; पण या सौंदर्यात नद्याही भर घालत असतात. त्यामुळे नद्याही खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या भारत देशात १०० हून अधिक मुख्य नद्या, तसेच त्याहून अधिक उपनद्या आहेत. नद्यांमुळे आसपासच्या गावाला, शहराला सौंदर्य प्राप्त होते. त्याशिवाय त्यामुळे नदीच्या आसपासचा परिसर खूप समृद्ध आणि सुंदर दिसतो. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? जगामध्ये भारतासह असे काही देश आहेत, जिथे सर्वाधिक नद्या वाहतात. ते देश नक्की कोणते आहेत. हे आम्ही सांगणार आहोत.

जगात सर्वाधिक नद्या असलेले देश

रशिया

रशियासारख्या मोठ्या देशात अनेक नद्या वाहतात. त्यात व्होल्गा, येनिसेई व लेना यांसारख्या नद्यांचा समावेश आहे. माहितीनुसार, या देशामध्ये हजारो नद्या वाहतात. सर्वाधिक नद्या असलेला रशिया या जगातील पहिला देश आहे.

ब्राझील

ब्राझीलमध्येही अनेक नद्या वाहतात. त्यातील अॅमेझॉन ही जगातील सर्वांत मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. तसेच या नदीच्या अनेक उपनद्यादेखील आहेत.

चीन

चीनमध्ये १५०० हून अधिक नद्या आहेत. यांग्त्झे ही नदी चीनमधील सर्वांत जास्त लांबीची नदी आहे. ही नदी नील व अॅमेझॉन या नद्यांनंतर जगातील तिसरी सर्वांत जास्त लांबीची नदी आहे. यासह चीनमध्ये इतर अनेक मुख्य आणि काही उपनद्याही आहेत.

बांगलादेश

भारतालगतच्या बांगलादेशमध्येही ७०० हून अधिक नद्या वाहतात. या देशात महानंदा, कर्णफूली, सुमा यांसारख्या काही प्रमुख नद्या आहेत. तसेच या देशातील ५३ नद्या भारतातूनही वाहतात.

भारत

भारत देश गंगा, यमुना व नर्मदा या पवित्र नद्यांमुळे ओळखला जातो. भारतातील नद्यांना धार्मिक महत्त्वदेखील आहे. भारतात जवळपास अनेक मुख्य आणि उपनद्या आहेत. त्यात गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, नर्मदा, गोदावरी या प्रमुख नद्या आहेत. गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबी असलेली नदी आहे. गंगा नदीची लांबी जवळपास २,५१० किमी आहे. तसेच भारतात ४०० हून अधिक नद्या असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा: पुण्यातील तीन सोंडांचा गणपती बाप्पा! १८व्या शतकातील त्रिशुंडी गणपती मंदिर तुम्ही पाहिलेय? मंदिरातील तळघरापासून मूर्तीपर्यंत सर्व गोष्टी रहस्यमय

कॅनडा

कॅनडा देशातही हजारो नद्या वाहतात. त्यातील मॅकेन्झी नदी ही या देशातील सर्वांत जास्त लांबीची नदी आहे. या नदीसह इतरही अनेक मुख्य आणि उपनद्या कॅनडामध्ये वाहतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यांसारख्या बऱ्याच देशांमध्ये अनेक नद्या वाहतात. नद्यांमुळे या देशांना पिण्याच्या पाण्याची समस्या सतावत नाही. त्याशिवाय या नद्यांच्या सौंदर्यामुळे आसपासचा परिसरही सुंदर दिसतो.