Indian Railways New Rules: तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वे प्रशासनाचा हा नवा नियम माहीत असणं गरजेचं आहे. अचानक कधीतरी तुम्हाला रेल्वे प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नाही, अनेकदा तिकिटांसाठी लागलेल्या लांब रांगा आपली डोकेदुखी ठरत असतात. अशा प्रसंगाला तुम्ही सामोरं जात असाल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला एक काम कराव लागणार आहे.

कसा कराल प्रवास ?
रेल्वेच्या नियमानुसार, प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी रेल्वेत गेल्यानंतर रेल्वेने अधिकार दिलेल्या गार्ड, टिसी किंवा इतर अधिकाऱ्याकडून रेल्वे प्रवासाची परवानगी घ्यावी लागेल. रेल्वे अधिकाऱ्याला आपली अडचण सांगून ती पटवून द्यावी लागेल. त्यामुळे या प्रवाशाला प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करण्यासाठी एक अधिकृत तिकीट दिले जाईल.

(आणखी वाचा : रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असते ही पिवळी पट्टी? जाणून घ्या यामागचे महत्त्वपुर्ण कारण)

रेल्वेत जनरल तिकीटावर स्लीपर किंवा अन्य आरक्षित डब्याचे तिकीट दिले जाते. तशाच प्रकारे ही सुविधा असेल. गार्डच्या परवानगी पत्राद्वारे रेल्वेचा टीसी तिकीटाएवढा दर आणि २५० दंड आकारून नियमित प्रवासाचे तिकीट देणार आहे. परंतु त्याला आरक्षित जागा मिळेलच असे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. त्यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. भाडे आकारताना, प्रवास संपण्याचे स्थानक देखील तेच स्थानक मानले जाते.