आयुष्यात पहिल्यांदा परदेशात प्रवास करण्याचा उत्साह आणि आनंद फार असतो. पण याच्यावेळी मनात दडपण, अस्वस्थता आणि एक भीतीचा भाव देखील असतो. यामुळे तयारी करताना अनेकदा काही ना काही गोष्टी आपण चुकतो किंवा विसरुन जातो. अशाने परदेशात पोहचल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे तुम्हीही पहिल्यांदाच परदेशी ट्रिपनिमित्त जात असाल तर ही ट्रिप अविस्मरणीय करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या खास गोष्टी कोणत्या आहेत जाणून घेऊ….

१) सर्वात आधी बॅगमध्ये पासपोर्ट ठेवा

परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत हरवू नये आणि तो घरात राहून जाऊ नये, यासाठी सर्वप्रथम पासपोर्ट आपल्या हॅण्डबॅगमध्ये व्यवस्थित ठेवा. प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला गेले किंवा हरवले, तर यावेळी त्रास होऊ नये म्हणून तुमच्या पासपोर्टची आणखी एक प्रत सोबत ठेवा. एक प्रत असल्यास तुम्हाला तुमचे नागरिकत्व सिद्ध करणे सोपे जाईल.

women are less likely to die when treated by female doctors annals of internal medicine study suggests
महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

२) वैद्यकीय विमा आणि औषधे

परदेशातील हवामान आणि वातावरण काहीसे वेगळे असल्यास तुम्ही आजारी पडू शकता, अशापरिस्थितीत काही देशांमध्ये वैद्यकीय सुविधा खूप महाग असतात, त्यामुळे तुमच्या डॉक्टर आणि विम्याशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे चांगले. जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासलेले नसाल तरीही फर्स्ट अँड बॉक्स नेहमी सोबत ठेवा. ज्यामध्ये सर्व आवश्यक औषधे असतील. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तुमची पॉलिसी परदेशात लागू आहे की नाही याची तुमच्या वैद्यकीय विमा प्रतिनिधींकडून खात्री करून घ्या.

३) आर्थिक नियोजन नीट करा

परदेशात जाण्यापूर्वी खर्चाचा थोडा हिशेब करून घ्या. आपल्याला किती पैशांची गरज भासू शकते? तुम्ही जिथे जात आहात त्या देशाच्या चलनात आणि आपल्या रुपयात काय फरक आहे? परदेशात जाण्यापूर्वी हे सर्व तपासा.

४) चार्जर, अडॅप्टरबरोबर ठेवा

वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्जिंग प्लग असतात, त्यामुळे तुम्ही तुमचा फोन परदेशात वापरत असल्यास, तुमच्यासोबत USB चार्जर ठेवा. यासोबत पॉवर बँक नक्कीच ठेवा.