India’s first republic day: प्रजासत्ताक दिन हा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारुपाला आला. मात्र देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन नेमका कसा साजरा झाला असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी गव्हर्नमेंट हाऊसच्या दरबार हाऊसमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५०, १९५२ साली साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आले आहेत.

Republic Day 2023: आदिशक्तीचा उदो उदो; महाराष्ट्राच्या चित्ररथात गाजला नारीशक्ती आणि देवीचा गजर, पाहा Video

Buoyed by Lok Sabha strike rate Rashtriya Lok Dal RLD looks to expand UP footprint
एकेकाळी राजकीय विजनवासात गेलेला ‘रालोद’ ताकद मिळताच उत्तर प्रदेशमध्ये कसा करतोय विस्तार?
‘बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणे अशक्य’
pm narendra modi vienna visit
“भारतानं जगाला बुद्ध दिला, युद्ध नव्हे”, पंतप्रधान मोदींचा व्हिएन्नातील भारतीयांशी संवाद; म्हणाले, “हजारो वर्षांपासून…”
PM Modi tells President Putin amid attacks on Ukraine
युद्धाने प्रश्न सुटत नाहीत! भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान मोदी यांचे खडेबोल
Russian Emperor Paul I Russia once planned to invade and capture India
रशियाचा झार जेव्हा भारत गिळंकृत करायला निघाला होता!
pm modi arrives in moscow to participate in the 22nd india russia annual summit
प्रादेशिक शांततेसाठी पूरक भूमिका! शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया
modi, Modi-Putin meeting,
विश्लेषण : मोदी-पुतिन भेट… रशिया आजही भारताचा महत्त्वाचा मित्रदेश का ठरतो?
Chandrababu Naidu announces Amaravati as sole capital city of Andhra Pradesh
चंद्राबाबू नायडूंनी निवडलेली नवीन राजधानी ‘अमरावती’; बौद्ध  स्तूपाचा वारसा असलेले हे शहर का आहे महत्त्वाचे?

हा व्हिडीओ ६ मिनिटे २८ सेकंदाचा असून यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इतर काही अधिकारी पाहायला मिळत आहेत. तसंच सैन्यदल आणि रणगाड्यांचे प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहेत.

तर अजून एका व्हिडिओत लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये प्रजासत्ताक दिन कशाप्रकारे साजरा झाला हे पाहायला मिळत आहे. यामध्ये भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन पुन्हा एकदा शपथ घेऊन भाषण देताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सीसी यांच्यात द्विपक्षीय चर्चा; दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीस नव्याने पुढे नेणार