जेव्हा प्रेमाची सुरुवात होते, त्यावेळी हृदय जोरजोरात धडधडतं, असं म्हणतात. त्यानंतर प्रेमळ भावनांनी वाढलेलं प्रेम फिजिकल अटॅचमेंटमध्ये बदलतं. अनेक लोक अशा प्रेमाची सुरुवात किस करून करतात. लोकांना असं वाटतं की, त्यांनी केलेला पहिला किस हृदयात राहावा आणि तो अविस्मरणीय असावा. पहिला किस आपल्या भावनांनाच जीवंत ठेवत नाही, तर अनेक प्रकारचे शारीरिक फायदेही होतात. या फिजिकल बेनिफिटमुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल घडतात.

स्ट्रेस लेव्हल कमी होते

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल आणि तुम्ही नैराश्यात असता, त्यावेळी तुम्ही दारुचं सेवन करण्याऐवजी कोणत्या गोष्टीची मदत घेता. नियमितपणे किस केल्यानं स्ट्रेस लेव्हल कमी होते. शरीरात स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलची कमतरता भासते. एवढच नाही तर किस केल्याने हॅपी हार्मोन्ससह गुड केमिकल ऑक्सिटोसिनही शरीरात प्रवेश करतं. ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.

फिलिंग्स आणि आनंद

किस केल्याने फिलिंग्स आणि आनंदी असल्यासारखं वाटतं. आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात हॅपी हार्मोन्स निर्माण होतात.

नक्की वाचा – मुकेश अंबानी यांच्यानंतर मुंबईत ‘या’ ठिकाणी आहे सर्वात महागडं घर, उद्योगपतीचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत

जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल, तर किस केल्यावर तुम्हाला या समस्येवर मात करता येऊ शकते. किस केल्यावर ब्लड लिपिड लेव्हलवर परिणाम होतो. रिपोर्ट्सनुसार, रोमॅंटिक किस केल्याने शरीरात सेरम कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि शरीरात असलेल्या घातक कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्ट रेट आणि ब्ल्ड फ्लो

जेव्हा तुम्ही कुणाला पहिल्यांदा किस करता, त्यावेळी शरीरात अचानक एड्रिनैलिन प्रवेश करतं. ज्यामुळे व्यक्तीचं हार्ट रेट वाढतं. त्यामुळे एनर्जी लेव्हल चांगलं होतं आणि रक्तप्रवाहही सुरळीत राहतो.