अलीकडेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यातील मिझोराम वगळता चारही राज्यांचा निकाल हाती आला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने विजय संपादन केला आहे. तर तेलंगणात काँग्रेसला यश मिळालं आहे. मिझोराम येथे आज मतमोजणी सुरू आहे. येत्या काही तासांत येथील निकाल स्पष्ट होतील. मत मोजणीला सुरुवात होण्याआधी पोस्टल बॅलेटद्वारे केलेल्या मतांचा आढावा घेतला जातो. ईव्हीएमच्या तुलनेमध्ये या मतांची संख्या कमी असल्याने त्यांची मोजणी करणं सोपं असतं. मतमोजणीची ही प्रक्रिया सुलभतेने आणि जलद गतीने पूर्ण होते. पण हे पोस्टल बॅलेट नक्की काय असते? याद्वारे कुणाला मतदान करता येतं? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. या लेखातून आपण याचा सविस्तर आढावा घेणार आहोत…

पोस्टल बॅलेट (Postal Ballots) ही एक मतदान करण्याची पद्धत आहे. या एका प्रकारच्या मतपत्रिका असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, मेलचा वापर करुन मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा काही ठरावीक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. संबंधित मतदाराला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे? त्याबाबतची माहिती भरुन मतपत्रिका मतमोजणीपूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते.

What are Postal Ballots
Postal Ballots म्हणजे नक्की काय? कोण असतात मतदार? कसं होतं मतदान? जाणून घ्या
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी

निवडणुकांपूर्वीच पोस्टल बॅलेट मतदारांच्या संख्येबाबत आढावा घेतला जातो. त्या-त्या मतदारांपर्यंत मतपत्रिका (Postal Ballot) पोहचवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. काही वेळेस मतदारांकडे इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध नसू शकतात. अशा वेळी ते पोस्टामार्फत मतपत्रिका पाठवू शकतात.

पोस्टल बॅलेट्स मतदान पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये:

-मतदार त्यांना नियुक्त केलेल्या मतदारसंघाबाहेरुन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

-या मतदान पद्धतीमध्ये मतदानाचे दोन स्तर असतात. मतदान प्रणालीमुळे मतदारांबाबतची माहिती गोळा करता येते.

-पात्र मतदार ETPB फाइल डाउनलोड करुन मतपत्रिका मिळवू शकतात. यासाठी OTP ची गरज असते.

-डाउनलोड केलेली मतपत्रिका उघडून त्यांचे वितरण करण्यासाठी एका पिनची आवश्यकता असते. हा पासवर्ड पिन आयोगाद्वारे दिला जातो.

-या मतदान पद्धतीमध्ये संपूर्ण गोपनीयता पाळली जाते.

पोस्टल बॅलेट्स मतदान पद्धतीतील त्रुटी

दुर्गम भागातील नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येतो. पण ६५ आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट मतदानामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते, असं काहींचं मत आहे. कारण हे ज्येष्ठ नागरिक अपुऱ्या शिक्षणामुळे मतदान करताना इतरांची मदत घेतात. तेव्हा गोपनीयतेचा भंग होतो. तसेच मदत करणारे मतदान करताना त्यांना फसवतात, असा युक्तिवादही केला जातो.