What is samosa called in English : समोसा हा शब्द जरी कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटतं. हा भारतीयांचा लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ आहे. कुरकरीत स्वादिष्ट असा समोसा आणि गरम चहा म्हणजे आपला देसी नाश्ता होय. बटाटे, वाटाणे आणि मसाल्यांच्या सारणाने भरलेल्या गरमागरम समोशाची चव ही अप्रतिम असते. त्यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना समोसा खायला आवडतो. कुठलेही लहान मोठे सेलिब्रेशन असू द्या, समोशाची ट्रीट ही असतेच. पण, या समोशाविषयीची एक गोष्ट तुम्हाला निराश करू शकते. समोसा हा मूळचा भारतातला नाही.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तात सांगितल्याप्रमाणे – समोसा हा १० व्या शतकात अस्तित्वात आला. इरानियन पठारावर मध्य पूर्व प्रदेशात हा अतिशय लोकप्रिय पदार्थ होता. तेव्हा त्याला ‘समोसा’ म्हणून ओळखले जात असे. सुरुवातीला, हा समोसा मांसाचे स्टफिंग भरून बनवला जायचा. त्यानंतर ही रेसिपी इजिप्त, लिबिया, मध्य आशियामध्ये लोकप्रिय झाली, ज्याला सानबुसक, सानबुसाक, तसेच सानबुसज म्हणून ओळखले जायचे.
तज्ज्ञांच्या मते, दिल्ली साम्राज्यामध्ये अनेक आक्रमणकर्त्यांनी राज्य केले. त्यादरम्यान ही रेसिपी स्वयंपाकघरात पोहोचली आणि त्यानंतर हळहळू स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाली.

प्राचीन धर्मग्रंथांनुसार, १३ व्या शतकात समोसा हा फक्त अरब आणि मध्य पूर्व देशातील राजघराण्यांसाठी आणि उच्चभ्रू लोकांसाठी होता. जेवणाच्या वेळी समोसा आवडीने चाखला जात असे.

पण, तुम्हाला माहितीये का समोशाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

समोशाला एकच इंग्रजी नाव नाही. अनेक ठिकाणी समोशाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
इंग्रजीमध्ये समोशाला ‘ट्रँग्युलर पेस्ट्री’ (triangular pastry) म्हणतात. त्याशिवाय समोसा आकाराने त्रिकोणी असल्याने आणि तळून हा पदार्थ तयार करण्यात येत असल्याने त्याला फ्राइड ट्रँग्युलर स्नॅक (fried triangular snack)सुद्धा म्हणतात.

स्टफ्ड पेस्ट्री (Stuffed Pastry) हा आणखी एक सामान्य इंग्रजी शब्द आहे जो समोशासाठी वापरला जातो. समोशामध्ये बटाटे आणि मसाल्याचे सारण असते. त्यामुळे समोशाला इंग्रजीमध्ये ‘स्पाइस्ड पोटॅटो टर्नओव्हर’ (spiced Potato Turnover)सुद्धा म्हणतात. हा कुरकुरीत होईपर्यंत तळला जात असल्याने याला फ्राइड डंपलिंग (Fried Dumpling)सुद्धा म्हणतात. त्याशिवाय समोशाचे रिसोल (Rissole) हे आणखी एक इंग्रजी नाव लोकप्रिय आहे.