Latest Marathi News अमुक अमुक गोष्ट झाली आम्ही उचित कार्यवाही केली. थांबा तो आला की आम्ही चांगली धडक कारवाई करणार. अशी वाक्यं आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. कार्यवाही करणे आणि कारवाई करणे हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. मात्र ते अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात. पोलीस कारवाई हा शब्दही आपण अनेकदा वाचतो. अनेकदा तो शब्द पोलीस कार्यवाही असाही लिहिला जातो. मात्र या दोन शब्दांचे अर्थ एकसारखे नाहीत तर पूर्णपणे भिन्न आहेत. कार्यवाहीचा अर्थ वेगळा आणि कारवाईचा अर्थ आणखी वेगळा. आपण या दोन्ही शब्दांमधला फरक समजून घेऊ.

कार्यवाही आणि कारवाई या शब्दांचा अर्थ आणि त्यातला फरक काय?

कार्यवाही या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे एखादी योजना आखणे, नियोजन करणे आणि त्या योजना किंवा नियोजनाप्रमाणे अमलबजावणी करणे म्हणजे कार्यवाही करणे. तर अशी अमलबजावणी करण्यात कुणी कसूर करत असेल, हयगय किंवा दुर्लक्ष करत असेल तर त्याला केली जाणारी शिक्षा किंवा दंड ठोठावणे या क्रियेला कारवाई असं म्हणतात. त्यामुळेच गुंडावर काय कारवाई केली असा प्रश्न विचारला जातो. तर वेळापत्रक लावलं आहे त्यानुसार कार्यवाही होते आहे की नाही? हे शाळेबाबत शाळा प्रमुखांनी पाहायचे असते. कार्यवाही आणि कारवाई हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरले गेले तर अर्थाचा अनर्थ होतो. अनेकदा नको त्या ठिकाणी कार्यवाही आणि कारवाई हे शब्द चुकीच्या किंवा एकाच वापरले जातात. त्यामुळे या शब्दांचा अर्थ आणि फरक समजून घ्या.

Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!
pollution level of firecrackers
फटाक्यांच्या प्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते? प्रदूषकांवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतात?

हे पण वाचा- श्रद्धांजली आणि आदरांजली हे शब्द कधी वापरतात? दोन्ही शब्दांमधला नेमका फरक काय?

सदानंद कदम लिखित ‘कहाणी शब्दांची-मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात या शब्दांचा अर्थ आणि फरक समजावून सांगण्यात आला आहे. कार्यवाही आणि कारवाई हे शब्द योग्य पद्धतीने कसे वापरले जातात याची काही उदाहरणं आपण पाहू.

उदाहरणे

सदनाची कार्यवाही २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे

सदनात गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर अध्यक्षांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने पत्रकारांना सांगितले न्यायालीन कार्यवाहीचं वार्तांकन करताना ते योग्य रितीने करण्याचं भान ठेवावं.

औषधांची भेसळ रोखण्यासाठी सरकारने संबंधितांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.

तर ही आपण काही उदाहरणं पाहिली. कार्यवाही आणि कारवाई हे दोन शब्द अगदी एकमेकांच्या विरोधातले आहेत. एकसारखे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे एकाच अर्थाने कुणी हे शब्द लिहित असेल तर त्यांनी योग्य ते शब्दच वापरले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने आग्रही असलं पाहिजे यात शंका नाही.