भारत-पाकिस्तान तणावादरम्यान विविध देशांकडे असणाऱ्या क्षेपणास्त्रांची चर्चादेखील सुरू आहे. कोणतेही क्षेपणास्त्र त्याच्या आकर्षक डिझाइन, अतुलनीय वेग, पल्ला आणि त्यात असलेल्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाते. ही सर्व वैशिष्ट्ये एका क्षेपणास्त्रात आणण्यासाठी विविध देशांतील क्षेपणास्त्र कंपन्या ते डिझाइन करण्यासाठी खूप मेहनत घेतात. या क्षेपणास्त्रातील प्रत्येक वैशिष्ट्याची चाचणी करणे आवश्यक असते. या वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशी जगातील सर्वांत वेगवान व घातक क्षेपणास्त्रे कोणती? त्याविषयी जाणून घेऊ.
जगातील पाच सर्वांत वेगवान क्षेपणास्त्रे
१. अवांगार्ड: अणु-सक्षम हायपरसोनिक बूस्ट-ग्लाइड क्षेपणास्त्र
देश : रशिया
पदनाम : पर्यायी नावे प्रोजेक्ट ४२०२ व यू-७४
वर्गीकरण : हायपरसोनिक ग्लाइड व्हेईकल (एचजीव्ही)
पेलोड : २ मेट्रिक टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते
हायपरसोनिक कामगिरी : मॅक २० (अंदाजे ६.८ किलोमीटर प्रतिसेकंद वेग गाठण्याची नोंद)
श्रेणी : ६,००० किलोमीटरपेक्षा अधिक.
अवांगार्ड हे रशियाने विकसित केलेले अण्वस्त्रसक्षम हायपरसोनिक बूस्ट-ग्लाइड क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र नेक्स्ट जनरेशनमधील सहा शस्त्रांपैकी एक आहे. त्यात ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला गाठण्याची क्षमता आणि अंदाजे २,००० किलोग्राम वजन आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सध्या एसएस-१९ ‘स्टिलेटो’द्वारे प्रक्षेपित केले जाते. सुरुवातीला आरएस-२६ ‘रुबेझ’साठी याला विकसित करण्यात आले होते. सुमारे १०० किमीच्या सब-ऑर्बिटल अपोजीवर पोहोचल्यानंतर अवांगार्ड वेगळे होते आणि लक्ष्याला गाठते.
२. डीएफ-४१
देश : चीन
पर्यायी नावे : डोंग फेंग-४१, सीएसएस-एक्स-२०
वर्ग : इंटरकॉंटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम)
बेसिंग पर्याय : रोड-मोबाईल, रेल-मोबाईल, सायलो
भौतिक परिमाण : लांबी (२० ते २२ मीटर), व्यास (२.२५ मीटर) आणि प्रक्षेपण वजन (८०,००० किलोग्रॅम)
पेलोड क्षमता : २,५०० किलोग्रॅम
रेंज : १२,००० ते १५,००० किलोमीटर
स्थिती: विकासाधीन
डोंग फेंग-४१ (डीएफ-४१) क्षेपणास्त्र चीनने विकसित केले आहे. हे चीनचे सर्वांत लांब पल्ल्याचे रोड-मोबाईल आयसीबीएम आहे, ज्याची रेंज १५,००० किलोमीटरपर्यंत आहे. त्यात अनेक स्वतंत्रपणे लक्ष्य करण्यायोग्य वॉरहेड्स (एमआयआरव्ही) वाहून नेण्याची क्षमता आहे. नवीन माहितीनुसार, डोंग फेंग-४१ २१-२२ मीटर लांब व २.२५ मीटर व्यासाचे आहे आणि त्याचे प्रक्षेपण वजन ८०,००० किलोग्राम आहे. याव्यतिरिक्त त्यात तीन-स्टेज सॉलिड प्रोपेलेंट इंजिन वापरले जाते.
३. यूजीएम-१३३ ट्रायडंट २ डी५ : पाणबुडी-प्रक्षेपित आयसीबीएम
देश : अमेरिका
पर्यायी नाव : ट्रायडंट २
मालमत्ता : युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम
वर्ग : पाणबुडी-प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
बेसिंग : पाणबुडी-प्रक्षेपित
भौतिक परिमाण : लांबी (१३.४२ मीटर), व्यास (२.११ मीटर), वजन ५९,०९० किलोग्रॅम
श्रेणी : किमान २,००० किलोमीटर, कमाल १२,००० किलोमीटर
स्थिती : ऑपरेशनल
ट्रायडंट २ एक घन-इंधन आणि पाणबुडीतून सोडले जाणारे आयसीबीएम आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिका व ब्रिटनने त्यांच्या ओहायो आणि व्हॅनगार्ड-क्लास पाणबुड्यांवर तैनात केले आहे. या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची श्रेणी १२,००० किलोमीटर असून, पेलोड क्षमता २,८०० किलो आहे. हे क्षेपणास्त्र कठीण लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. त्यातील इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम, स्टेलर रेफरन्स सिस्टीमद्वारे समर्थित असून, अचूकपणे लक्ष्य गाठू शकते. हे क्षेपणास्त्र १३.४२ मीटर लांब, २.११ मीटर व्यासाचे व प्रक्षेपणाच्या वेळी ५९,०९० किलोग्रॅम वजनाचे आहे.
४. मिनिटमन ३: अमेरिकेचे तीन-टप्प्याचे घन इंधन आयसीबीएम
देश : अमेरिका
प्रकार : क्राफ्ट – क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स
निर्माता : बोईंग कंपनी
परिमाण : अंदाजे १८.२०१ मीटर लांब आणि १.८२८८ मीटर (६ फूट) व्यासाचे.
साहित्य : प्रामुख्याने स्टील आणि टायटॅनियम या मिश्र धातूंनी तयार करण्यात आलेले
पर्यायी नाव : मिनीटमन ३ क्षेपणास्त्र
एलजीएम-३० जी मिनीटमन ३ क्षेपणास्त्र अमेरिकेत तयार करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र १९७० च्या दशकाच्या सुरुवातीपासून कार्यरत आहे. बोईंगने या पृष्ठभागावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची रचना आणि निर्मिती केली आहे. त्याव्यतिरिक्त हे क्षेपणास्त्र ‘एमआयआरव्ही’ने सुसज्ज असलेले पहिले अमेरिकन क्षेपणास्त्रदेखील आहे. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेकडे सध्या अशी ४४० क्षेपणास्त्रे असल्याचा अंदाज आहे. हे तीन टप्प्यांचे घन-इंधन क्षेपणास्त्र १८.२ मीटर लांब, १.८५ मीटर व्यासाचे आणि ३४,४६७ किलोग्रॅम वजनाचे आहे. या क्षेपणास्त्राची श्रेणी १३,००० किलोमीटर आहे.
५. आरएस-२८ सरमत
देश : रशिया
वर्ग : इंटरकॉंटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम)
पर्यायी नाव : एसएस-एक्स-३० सेटन – २
बेसिंग : सायलो-आधारित
भौतिक परिमाण : लांबी (३५.३मीटर), व्यास (३.० मीटर)
पेलोड : १०,००० किलोग्रॅम
वॉरहेड : न्यूक्लीयर, एमआयआरव्ही किंवा ग्लाइड व्हेइकल्स
प्रोपल्शन : तीन टप्प्यांचे द्रव-इंधन क्षेपणास्त्र
श्रेणी : १०,००० ते १८,००० किलोमीटर
स्थिती : विकासात
आरएस – २८ सरमत २००० च्या दशकापासून रशियामध्ये विकसित होत असलेले इंटरकॉंटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते ११ ते १८ हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. २०० टनांपेक्षा अधिक वजनाची शस्त्रास्त्रे ते वाहून नेते. त्यामध्ये एकाच वेळी १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर शस्त्रास्त्रे डागण्याचे तंत्रज्ञान आहे. आरएस – २८ सरमतला नाटोने सेटन – २ हे नाव दिले आहे. सरमत हे जगातील सर्वांत लांब पल्ल्याच्या लक्ष्याचा भेद करणारे क्षेपणास्त्र असल्याचा दावा रशियाने केला आहे.