Indian Cobra vs King Cobra: कोब्रा जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक आहे. या सापाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात विष असतं. कोब्राने एकदा चावा घेतल्यावर जीव वाचण्याची शक्यता धूसर असते. मग तो माणूस असो वा प्राणी. या सापांना पाहिल्यावर सर्वजण रस्ता बदलतात. हे साप चिडल्यावर भयानक हल्ला करतात. समोर आलेल्या व्यक्तीवर किंवा प्राण्यावर फणा काढून चावा घेण्याचा प्रयत्न करतात. हे साप अनेक देशांमध्ये आढळतात. पण भारतात आढळणारे कोब्रा आणि किंग कोब्रा यांच्यात खूप फरक आहे. जाणून घेऊयात या दोन्ही सापांमध्ये जास्त खतरनाक साप कोणात आहे.

किंग कोब्राची लांबी किती असते?

इंडियन कोब्रा ४ ते ७ फूट तर किंग कोब्रा जवळपास १३ फूट लांब असू शकतो. काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या कालाढूंगी परिसरात एका विशाल किंग कोब्राची लांबी मोजली होती. तो साप २३ फूट ९ इंच इतक्या लांबीचा होता. वन्य प्राणी नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो जगातील सर्वात लांब किंग कोब्रा होता. या सापाची लांबी मोजण्यासाठी तीनवेळा माप घ्यावं लागलं आणि हा सापा खूप दुर्मिळ असल्याचं बोललं जात आहे.

नक्की वाचा – पेट्रोल पंपावर केली कमाल! तरुणीचं धाडस पाहून दुचाकीस्वाराने दिलं भन्नाट गिफ्ट, १ कोटी व्यूज मिळालेला Video तुम्ही पाहिलात का?

कोणता साप जास्त खतरनाक?

इंडियन कोब्राचं विष जास्त खतरनाक असतं. परंतु, किंग कोब्राकडे शिकार करण्यासाठी शरीरात जास्त विष सोडण्याची क्षमता असते. त्यामुळे दोघांची ताकद जवळपास सारखीच असते. या सापांनी चावल्यावर वाचण्याची शक्यता खूपच कमी असते आणि १५ मिनिटांच्या आत माणसांचा मृत्यू होऊ शकतो. किंग कोब्राने एका वेळेस विष सोडल्यावर ११ लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर इंडियन कोब्रा एकावेळी जवळपास दहा लोकांचा जीव घेऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० वर्षांपर्यंत जीवंत राहतात किंग कोब्रा

किंग कोब्राचे दात इंडियन कोब्राच्या दातांच्या तुलनेत २ इंच मोठे असू शकतात. इंडियन कोब्रा नेहमीच पसरलेल्या अवस्थेत बसतात. त्यामुळे त्यांची चावण्याची शक्यता अधिक असते. किंग कोब्राला मोठ्या आकाराचा फणा असतो आणि त्याच्यावर सफेद रंगाच्या रेषा असतात. किंग कोब्रा त्यांच्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच उचलू शकतात आणि हे साप जवळपास २० वर्षांपर्यंत जीवंत राहू शकतात.