Longest Journey In The World : विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. काही लोकांना विमान प्रवास करायला खूप आवडतं. पण आकाशात कमीत कमी १८ ते २० तास विमान प्रवास तुम्ही कधी केला आहे का? आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लांबच्या विमान प्रवासाबाबत सांगणार आहोत. अशाप्रकारच्या विमान प्रवासात तुम्हाला कमीत कमी किती वेळ आकाशात राहावं लागतं, याबाबती तुम्हाला माहिती देणार आहोत. सर्वात मोठी गोष्टी म्हणजे, अशाप्रकारचा विमान प्रवास नॉन स्टॉप असतो. एकदा विमानाने टेक ऑफ केलं की, १७ ते १८ तासांचा प्रवास केल्यावरच विमान लॅंड होतं.

सिंगापूरवरून न्यूयॉर्कचं उड्डाण

जगातील सर्वात लांबच्या विमान प्रवासात सिंगापूर ते न्यूयॉर्क प्रवासाचा समावेळ आहे. सिंगापूर एअरलाईन्सचे विमान SQ24 प्रवाशांना सिंगापूरवरून न्यूयॉर्कच्या जॉन एफ कॅनेडी इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत घेऊन जातं. हा प्रवास आतापर्यंतचा सर्वात लांब आणि जास्त वेळ घेणारा प्रवाशांपैकी एक आहे. हे विमान १५,००० किमीपर्यंतचा प्रवास करतं. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास १७ तास ४० मिनिटांहून अधिक कालावधी लागतो.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
IndiGo flights delayed after system crashes
पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

सिंगापूर ते नेवार्की प्रवास

दुसरा सर्वात लांबचा प्रवास सिंगापूरचाच आहे. सिंगापूर एअरलाईन्सद्वारे ऑपरेट केलेली ही यात्रा जवळपास १७ तास २५ मिनिटे इतकी असते. हे विमान सिंगापूरवरून न्यू जर्सी, अमेरिकेच्या नेवार्कपर्यंत असते. सिंगापूर एअरलाईन्सकडून संचालित एअरबस A350-900s दुसरा सर्वात लांबचा प्रवास पूर्ण करते.

नक्की वाचा – चित्रपटात दाखवण्यात येणारे बोल्ड सीन्स खरे की खोटे? किसिंग सीन्सच्या ट्रिक्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

डार्विनवरून लंडनपर्यंतचा प्रवास

डार्विनवरून लंडनपर्यंतचा प्रवास जगातील सर्वात लांबच्या प्रवाशांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाच्या डार्विनवरून ब्रिटेनच्या लंडनपर्यंतचा हा प्रवास बोईंग 787 ड्रीमलायनर्ससोबत पूर्ण होतो. प्रवास १६ ते १७ तासांत पूर्ण होतो. हा संपूर्ण प्रवास जवळपास १४,००० किमीपर्यंतचा असतो. खरंतर हा प्रवास मूळत: पर्थ आणि लंडनच्या मध्ये संचालित केला होता. पण कोविडच्या कारणामुळं डार्विनमध्ये स्थानांतरित केलं होतं. आता पुन्हा एकदा जुन्या मार्गाने हा प्रवास केला जाण्याची शक्यता आहे.

सॅन फ्रांसिस्कोवरून बंगळुरुचा प्रवास

भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नोकरी आणि शिक्षणसाठी काही लोकं भारतातून अमेरिकेला जातात. पण हा प्रवास भारत ते अमेरिका नाहीय. तर अमेरिका आणि भारताच्या मधील आहे. युनायटेड एअरलाइंस तुम्हाला अमेरिकेच्या सॅन फ्रांसिस्कोवरून भारतातील बंगळुरुपर्यंत घेऊन जाते. या प्रवासाठी जवळपास १७ तास २५ मिनिटांचा अवधी लागतो.