What causes waves in the ocean : समुद्र हा अथांग असतो, जिकडे नजर जाईल तिकडे तो दूरपर्यंत पसरलेला दिसतो. प्रत्येकाला समुद्र किनारी जाऊन समुद्राला जवळून पाहावसं वाटतं. समुद्र किनारी एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा, हे दृश्य खूप सुंदर वाटतं. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलंय त्यात समुद्राचे सौंदर्य हे अद्भूत आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, मंद सुटलेला गार उष्ण वारा, सुर्योदय किंवा सुर्यास्ताच्या वेळी दिसणारं विलोभनीय दृश्य प्रत्येकाला पुन्हा पुन्हा पाहावसं वाटतं. तुम्ही अनेकदा समुद्राच्या लाटा बघितल्या असतील. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की समुद्रात लाटा का निर्माण होतात? यामागे नेमकं कारण काय आहेत, आज आपण त्या विषयी जाणून घेऊ या.

समुद्रात लाटा का निर्माण होतात?

समुद्रात लाटा का निर्माण होतात, असा प्रश्न कदाचित खूप कमी लोकांना पडला असेल. याचा संबध गुरुत्वाकर्षणाशी जोडलेला आहे.सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणांमांमुळे लाटा निर्माण होतात. या लाटांना आपण म्हणजे भरती किंवा ओहोटी म्हणतो. या लाटा विशेषत: अमावास्या आणि पौर्णिमेला दिसून येते. समुद्राला भरती येताना त्सुनामी येऊ शकते असा एक सामान्य गैरसमज आहे.

हेही वाचा : शुभ मंगल सावधान! लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता का टाकतात? अक्षता शब्दाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

https://oceanservice.noaa.gov/ च्या वेबसाइटनुसार समुद्राच्या पाण्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन लाटा तयार होतात. ही ऊर्जा वारा आणि पाण्यामध्ये घर्षणामुळे निर्माण होते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागावरून वारा खूप वेगाने वाहतो तेव्हा लाटा तयार होतात. अशाप्रकारच्या लाटा समुद्राच्या किनाऱ्यावर सहसा पाहायला मिळतात. लाटा निर्माण होण्यासाठी पाण्याचा वेग, गुरुत्वाकर्षण आणि वाऱ्याची गती इत्यादी घटक कारणीभूत असतात.त्यामुळे यापुढे जर तुम्ही कधी समुद्राच्या लाट पाहिल्या तर तुम्हाला या लाटा का निर्माण होतात, यामागील कारण समजेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही बघितले असेल अनेकदा चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठ्या लाटा आदळताना दिसतात.अशा वादळांमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर आणि समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यावर खूप दाब निर्माण होतो ज्यामुळे लाट अधिक तीव्र होते आणि तिचे स्वरुप मोठे झाल्याचे दिसून येते. याशिवाय जर समुद्रात भूकंप, भूस्खलन आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक लाटा समुद्रकिनारी येण्याची दाट शक्यता असते. या लाटांना ‘त्सूनामी’ म्हणतात. त्सूनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत होण्याची शक्यता असते.