International Father’s Day : आज दि. १८ जून. जून महिन्याचा तिसरा रविवार हा बऱ्याच राष्ट्रांमध्ये फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. परंतु, मध्ययुगीन काळात युरोपमध्ये ‘सेंट जोसेफ डे’ हा ‘फादर्स डे’ होता. काही राष्ट्रांमध्ये फादर्स डे ही सार्वजनिक सुट्टी होती. १९१० पासून जून महिन्याचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु, अनेक राष्ट्रांमध्ये फादर्स डे विविध दिवशी साजरा करण्यात येतो. असे वेगवेगळ्या दिवशी फादर्स डे का साजरे करण्यात येतात, हे जाणून घेणे उचित ठरेल…

आफ्रिकन राष्ट्रांमधील ‘फादर्स डे’ची परंपरा

आफ्रिकन राष्ट्रांमध्ये काही देश जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा करतात. अल्जेरिया, केनिया, मोरोक्को, नायजेरिया,दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांमध्ये जूनमधील तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु, इजिप्तमध्ये दरवर्षी २१ जून हा फादर्स डे म्हणून साजरा करतात. मोझांबिकमध्ये १९ मार्च, सेशेल्समध्ये १६ जून रोजी फादर्स डे साजरा करतात. दक्षिण सुदानमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या सोमवारी फादर्स डे साजरा केला जातो. २७ ऑगस्ट, २०१२ रोजी राष्ट्राध्यक्ष सल्वा कीर मयार्डिट यांनी याची घोषणा केली. प्रथम फादर्स डे २७ ऑगस्ट, २०१२ रोजी साजरा करण्यात आला, २०११ पर्यंत दक्षिण सुदानमध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला नव्हता.

Maharashtra Day 2024 Celebration of cultural program with flag hoisting
औचित्य महाराष्ट्र दिनाचे… ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी
Mumbai Municipal Corporation, bmc Imposes Fines on Contractors, Fines on Contractors for Negligence in Drain Cleaning, bmc Fines on Contractors, Negligence in Drain Cleaning in Mumbai, Drainage Cleaning, marathi news, drainage cleaning news,
मुंबई : नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई
Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

आशियाई देशांमधील ‘फादर्स डे’

भारत, बांगलादेश, मलेशिया, जपान, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका आणि चीन हे यूएसएने ठरवून दिल्याप्रमाणे फादर्स दे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करतात. परंतु, इंडोनेशियामध्ये, फादर्स डे १२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. इंडोनेशियातील फादर्स डे पहिल्यांदा २००६ मध्ये विविध धर्मातील लोकांच्या समुदायाच्या उपस्थितीत सुरकार्ता सिटी हॉलमध्ये घोषित करण्यात आला होता. इराणमध्ये, इराणी कॅलेंडरवर आधारित एसफंदच्या २४ तारखेला, रेझा शाह यांच्या वाढदिवसाला फादर्स डे म्हटले जात होते. १९५७ नंतर हा दिवस शियाचे पहिले इमाम अली बिन अबी तालिब यांचा जन्मदिन 13 रजब हा फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. कझाकिस्तानमध्ये २०१२ पासून,कझाकस्तान सशस्त्र दलाच्या पायाभरणीच्या स्मरणार्थ पितृभूमी रक्षण दिवस (Defender of the Fatherland Day) साजरा करतो. याला ‘सैन्य दिन’देखील म्हणतात. हा दिवस ७ मे रोजी साजरा करण्यात येतो. हा दिवस ‘मेन्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. पूर्णपणे ‘फादर्स डे’ ते साजरा करत नाहीत. मंगोलियन मेन्स असोसिएशनने ८ ऑगस्ट, २००५ पासून फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांचा फादर्स डे हा १८ मार्च रोजी असतो. नेपाळमधील ‘नेवार’ या दिवशी वडिलांचा सन्मान करतात. हा सण तिथीने येतो. यालाच कुशे औसी असेही म्हणतात. या वर्षी नेपाळचा फादर्स डे १४ सप्टेंबर रोजी आहे. काठमांडूमध्ये भाद्रपद अमावस्येला दिवंगत वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. ही परंपरा महाराष्ट्रातील हिंदूंमध्येही आहे. यालाच सर्वपित्री अमावस्या म्हणतात. दक्षिण कोरियामध्ये मदर्स डे आणि फादर्स डे असे वेगळे साजरे करण्यात येत नाहीत. दोहोंचे एकत्रिकीकरण करून ८ मे पालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तैवानमध्ये ८ ऑगस्ट हा ‘पा हॉलिडे’ म्हणून साजरा करतात. हाच उगाच फादर्स डे असून या दिवशी त्यांना सुट्टी असते. थायलंडमध्ये, दिवंगत राजा भूमिबोल अदुल्यादेज (रामा नववा) यांचा वाढदिवस ५ डिसेंबर रोजी फादर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे राणी सिरिकितच्या वाढदिवसाला १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.

हेही वाचा : पितृ-पिता, पीटर-फादर, डॅड-डॅडी, पापा-पप्पा, बाप्पा; काय आहे ‘फादर’ शब्दाचा प्रवास ?

बहुतांशी युरोपियन राष्ट्रे फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी का साजरा करत नाहीत ?

युरोपियन राष्ट्रांमध्ये ख्रिश्चन समुदाय अधिक आहे. त्यामुळे येथील बहुतांशी राष्ट्रांमध्ये फादर्स डे हे धार्मिक अंगांनी निश्चित केलेले दिसतात.
रोमन कॅथोलिक परंपरेत फादर्स डे सेंट जोसेफ डे ला म्हणजेच १९ मार्च रोजी साजरा केला जातो. बेलारूसमध्ये २१ ऑक्टोबर रोजी फादर्स डे साजरा केला जातो. बेल्जियम आणि ऑस्ट्रियामध्ये जूनचा दुसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. बल्गेरियामध्ये, फादर्स डे २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. नाताळच्या दुसऱ्या दिवशी फादर्स डे साजरा करण्याची तिथे परंपरा आहे. डेन्मार्कमध्ये फादर्स डे (फार्स डेग) ५ जून रोजी त्यांच्या संविधान दिनासह साजरा केला जातो. एस्टोनिया, आइसलँड, नॉर्वे आणि फिनलँडमध्ये, फादर्स डे नोव्हेंबरच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो, हाच दिवस त्यांचा ‘फ्लॅग डे’ म्हणजेच ध्वज दिन असतो. लिथुआनियामध्ये, फादर्स डे जूनच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पोर्तुगालमध्ये १९ मार्च रोजी फादर्स डे साजरा केला जातो. रोमानियामध्ये २९ सप्टेंबर, २००९ रोजी फादर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करण्याचे ठरवण्यात आले.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये फादर्स डे सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. सामोआमध्ये फादर्स डे ऑगस्टमधील दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो आणि त्यानंतरच्या सोमवारी एक मान्यताप्राप्त राष्ट्रीय सुट्टी आहे. अर्जेंटिनामध्ये फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.

अशाप्रकारे विविध देशांमध्ये विविध दिवशी फादर्स डे साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल फादर्स डे असला तरी अनेक राष्ट्रे जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करत नाही.