उन्हाळा सुरु आहे. या काळामध्ये बनवलेले पदार्थ लगेच खराब होतात. असे घडू नये यासाठी ते पदार्थ थंड वातावरणामध्ये ठेवणे आवश्यक असते. जेवण ठेवण्यासाठी आणि थंड पाण्यासाठी म्हणून उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पूर्वा रेफ्रिजरेटर ही खूप मौल्यवान वस्तू आहे असे लोक समजत असत. आता या उपकरणाचा वापर करणे लोकांसाठी सवयीचे झाले आहे. सर्व सामान आतमध्ये व्यवस्थितपणे ठेवता येईल अशी फ्रिजरेटरची रचना केलेली असते.

रेफ्रिजरेटरच्या फ्रीजर या भागामध्ये आईसक्रीम, बर्फ वगैरे गोष्टी असतात. लहान मुलांना आईसक्रीम खाण्याचा सतत मोह होत असतो. आईसक्रीम खाल्याने दात खराब होऊ शकतात. त्यामुळे फ्रीजर हा रेफ्रिजरेटरच्या वरच्या बाजूला असतो असे काहीजण म्हणत असतात. फ्रीजर वर असल्याने मुलांचा हात वरपर्यंत पोहचत नाही असा तर्क लोक लावतात. पण खरंच या कारणामुळे फ्रीजर Refrigerator च्या वरच्या बाजूला असतो का?

Freezer वरच्या बाजूला असण्यामागील कारण

गरम हवा ही वजनाने हलकी आणि थंड हवा जड असते हे सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. Refrigerator मधील फ्रीजरचा भाग थंड असतो. परिणामी त्यातील हवा जड असल्याने ती खाली येत राहते. त्याच वेळी फ्रीचरचा खालचा भाग जिथे भाज्या, जेवण, पाण्याच्या बाटल्या असतात, तेथील हवा ही फ्रीजरच्या हवेच्या तुलनेमध्ये गरम आणि हलकी असते. ही हवा कमी वजनामुळे वर यायचा प्रयत्न करत असते. गरम हवा फ्रीजरवर आदळते आणि थंड होऊन पुन्हा खाली जाते. तेव्हा खालच्या बाजूची गरम हवा वर येते. अशा प्रकारे रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये एक वायुचक्र सुरु राहते.

आणखी वाचा – ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडी Ice-cream, किंमत वाचून तुम्हाला एसीसमोर फुटेल घाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्रीजर Refrigerator च्या खालच्या बाजूला असला तर काय होईल?

जर फ्रीजर Refrigerator च्या खालच्या बाजूला असेल, तर त्यातील थंड हवा खाली जाईल आणि गरम हवा वरच्या बाजूला पोहचेल. असे झाल्याने फ्रिजमधील तापमान नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक असलेले चक्र बंद पडेल. यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या गोष्टी लवकर खराब होतील.