भारतात मोठमोठी मंदिरे बांधण्यात आली आहेत. तसंच किल्ले बांधण्यातही भारत मागे राहिलेला नाहीय. भारताच्या वेगवेगळ्या भागात ५०० हून अधिक किल्ले आहेत. यामध्ये अनेक किल्ल्यांचा इतिहास शंभर वर्षे जूना आहे. तर काही किल्ल्यांच्या इतिहासाबाबत अजूनही अनेकांना माहित नाहीय. काही किल्ल्यांच्या रहस्यमय कहाण्याही आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या एका किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. या किल्ल्यावरून पाकिस्तान देश दिसतो, असंही म्हटलं जातं. तसंच या किल्ल्याचा आठव्या दरवाजाचाही मोठा इतिहास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किल्ल्यावरून पाकिस्तानला पाहू शकता

मेहरानगढ दुर्ग असं या किल्ल्याचं नाव आहे. मेहरानगढ फोर्ट राजस्थानच्या जोधपूर शहराच्या मधोमध बांधण्यात आला आहे. हा किल्ला जवळपास १२५ मीटर उंचीपर्यंत बनवलेला आहे. १५ व्या शतकात या किल्ल्याचं बांधकाम राव जोधा यांनी केलं होतं. पण या किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी जसवंत सिंह यांनी घेतली होती. मेहरानगढ भारतातील प्राचिन आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्याला भारताचा समृद्धशाली किल्ला म्हणूनही ओळखलं जातं.

नक्की वाचा – बापरे! १५०० किलो वजनाचा साप! या नदीत आढळतात जगातील सर्वात मोठे आणि खतरनाक साप? कारण…

किल्ला कसा बांधला?

जोधपूरचे १५ वे राजे झाल्यानंतर एक वर्षानंतरच राव जोधा यांना वाटलं की, मंडोरचा किल्ला त्यांच्यासाठी सुरक्षित नाहीय. त्यामुळे त्यांनी तत्कालीन किल्ल्यापासून १ किलोमीटर दूर असलेल्या डोंगरावर एक किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. याच डोंगराला भोर चिडियाटूंक म्हटलं जातं. कारण तिथे पक्षांचा खूपच किलबिलाट असतो. कारण तिथे राहणाऱ्या पक्षांची संख्या खूप जास्त होती. १४५९ मध्ये राव जोधा यांनी किल्ला बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

आठवा दरवाजा आहे रहस्यमय

आठ दरवाज्यांचा हा किल्ला टोलेगंज इमारतींनी घेरलेला आहे. या किल्ल्याचे सातच दरवाजे आहेत. पण या किल्ल्यात आठवा रहस्यमय दरवाजाही असल्याचं म्हटलं जातं. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दरवाजाला खिळे लावण्यात आले आहेत. हत्तींच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा, यासाठी दरावाज्यांना खिळे लावण्यात आले होते. किल्ल्यात अनेक मोठे महल, अद्भूत नक्शीदार दरवाजे आणि जाळीदार खिडक्या बनवलेल्या आहेत. यामध्ये मोती महल, शीश महल, फूल महल, सिलेह खाना आणि दौलत खाना आहे. किल्ल्याजवळ चामुंडा मातेचा एक मंदिर आहे, ज्याला १४६० मध्ये राव जोधा यांनी बांधलं होतं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can see pakistan from rajasthans mehrangarh fort know about mehrangarh mysterious things forts in india nss
First published on: 24-02-2023 at 19:11 IST