या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’मला प्रथमच नवीन गाडी घ्यायची आहे. मला माझ्या कुटुंबीयांसह पूर्ण भारतभर गाडीतून फिरायचे आहे. फॉच्र्युनर, अ‍ॅव्हेंचर आणि एक्सयूव्ही ५०० यापैकी कोणती गाडी घेऊ.
– सावन घोडमारे, नागपूर<br /> ’तुम्हाला मी टाटा सफारी स्टॉर्म ही गाडी घ्यायला सांगेन. ही गाडी प्रशस्त तर आहेच शिवाय तिचे सस्पेन्शन अगदी व्होल्वो बससारखेच आहे. तिचा मायलेजही १३.५ किमी प्रतिलिटर एवढा आहे. भारतभ्रमणासाठी ही गाडी अगदी योग्य आहे. मात्र, तुम्ही सात-आठ जण असाल तर टोयोटा इनोव्हा ही गाडी घ्यावी. ही गाडी सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून चांगली चालते आणि या गाडीच्या इंजिनाचे आयुष्यही चांगले आहे.
’मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट साडेतीन ते साडेचार लाख रुपये इतके आहे. सेलेरिओ व्हीएक्सआय आणि व्ॉगन आर व्हीएक्सआय या गाडय़ांविषयी तुमचे मत काय आहे. यापैकी कोणती कार माझ्यासाठी योग्य ठरेल. माझी उंची सहा फूट आहे.
– अजय फरांदे
’तुमच्या उंचीनुसार तुमच्यासाठी व्ॉगन आर ही गाडीच योग्य ठरेल. मात्र, व्ॉगन आर एलएक्सआय चार लाख ८० हजारांपर्यंत मिळेल.
’माझ्याकडे २००८ मधील होंडा सिटी झेडएक्स ही गाडी आहे. मला ही गाडी विकायची असून मला फॅमिली कार घ्यायची आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. मारुती अर्टिगा कशी आहे. मला जर छोटी कार घ्यायची असेल तर नवीन जॅझ किंवा ह्य़ुंडाई एलिट २० या गाडय़ा कशा आहेत. कृपया सांगावे.
– डॉ. सचिन घोलप
’तुम्ही तुमची आताची होंडा सिटी पावणेतीन लाख रुपयांपुढे विकू शकता. तुम्ही आता मारुती बालेनो ही प्रीमियम हॅचबॅक घेऊ शकता. मात्र, तुम्हाला खूपच घाई असेल तर फोक्सव्ॉगनची पोलो ही चांगली कार आहे.
’आमच्याकडे कार नाही. माझ्या बाबांना कार घ्यायची असून आमचे बजेट १२ लाख रुपये आहे. आम्ही स्कॅर्पिओ किंवा इनोव्हा घेण्याच्या तयारीत आहोत. तुम्ही काय सुचवाल.
– सिद्रया गोंडा
’मी तुम्हाला एक्सयूव्ही५०० ही गाडी घेण्याचा सल्ला देईल. हे मॉडेल तुम्हाला १२ लाखांपर्यंत आरामात मिळू शकेल. तसेच इतरांच्या मानाने ही गाडी प्रशस्त आहे आणि तिचा मायलेजही चांगला आहे.

More Stories onकारCar
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car i choose
First published on: 27-11-2015 at 06:54 IST