* माझे बजेट नऊ ते ११ लाख रुपये आहे. माझे साप्ताहिक ड्रायव्हिंग २०० ते २५० किमी आहे. मला जास्त मायलेज देणारी आणि चांगला ग्राऊंड क्लिअरन्स असलेली तसेच सहा-सात जण आरामात बसू शकतील अशी गाडी हवी आहे. मला कोणती गाडी सोयिस्कर ठरेल.
– पियुष भावे, अमरावती
* रेनोची लॉजी ही गाडी तुमच्यासाठी योग्य ठरेल. ती नक्कीच ११ लाखांत उपलब्ध होईल तसेच डिझेलवर चालणारी गाडी तुम्ही घ्या. तुम्हाला तातडीने गाडी घ्यायची असेल तर होंडाची मोबिलिओ हाही एक चांगला पर्याय आहे.
* मला ऑटोमॅटिक गीअर शिफ्टिंगवाली सात आसनी गाडी घ्यायची आहे. मार्केटमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत. एखादी येऊ घातलेली गाडी असेल, ती सुचवली तरी चालेल.
– श्रीमल मालंडकर, वाशी
* फार कमी पर्याय आहेत बजेट कार्समध्ये. महिंद्रा क्वांटो आणि स्कॉर्पिओ या त्यातल्या त्यात चांगल्या गाडय़ा आहेत. बाकी सर्व गाडय़ा २० लाखांच्या वर किमतीच्या आहेत.
* माझ्याकडे स्विफ्ट डिझायर व्हीएक्सआय हे २०११चे मॉडेल आहे. माझा रोजचा गाडीवापर ५० किमी आहे. गाडीत सीएनजी कीट बसवावे का. सीएनजी लावल्यानंतरही माझ्या गाडीला रिसेल व्हॅल्यू असेल का. सीएनजी लावल्यानंतर गाडीच्या कामगिरीत फरक पडतो, असे मी ऐकले आहे. कितपत तथ्य आहे.
– योगेश पवार, डोंबिवली
* होय, तुम्ही सीएनजीमध्ये तुमची गाडी परावर्तित करू शकता. तुम्ही लोवाटो, फॉच्र्युन, ग्रीनग्लोब यापैकी कोणतेही एक सीएनजी कीट बसवून घ्या. तुमच्या गाडीच्या कामगिरीत कोणताही फरक पडणार नाही. तुम्हाला प्रतिकिलो १८ किमी एवढा मायलेज मिळू शकेल. गाडीच्या रिसेल व्हॅल्यूत काहीच फरक पडत नाही.
* मला पेट्रोलवर चालणाही होंडा सिटी कार घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा.
– संजय खानापुरे
* सर्वोत्तम कार आहे. तसेच कोणत्याही कटकटीविना तुम्ही ही गाडी खूप वर्षे वापरू शकता. तुम्हाला चांगला मायलेज देणारी आणि प्रशस्त गाडी हवी असेल तर तुम्ही मारुती सिआझ किंवा स्कोडा रॅपिड यांचा विचार करावा.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.