मी पंतप्रधान होण्याआधी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते. त्यावेळी देशात मोबाइलची निर्मिती करणारे फक्त दोन कारखाने होते. आता पाच वर्षांच्या आत देशात मोबाइल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची संख्या १२५ पेक्षा जास्त आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी हरदोई येथील सभेत म्हणाले. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती फक्त सत्तेसाठी, मोदींना पराभूत करण्यासाठी मोठया आनंदाने समाजवादी पार्टीसाठी मते मागत आहेत.

ज्यांनी बाबासाहेबांचा मान ठेवला नाही त्यांना तुम्ही मिठया मारत आहात असा आरोप मोदींनी केला. मी मागास नाही. अती मागास जातीमध्ये माझा जन्म झाला आहे. तुम्ही मला बोलायला भाग पाडत आहात म्हणून मी बोलत आहे. माझा देश मागास असेल तर वरची जात कुठली? मला संपूर्ण देशाला पुढे घेऊन जायचे आहे.

महामिलावटी फक्त स्वत:च्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करणार. त्यांना देशाच्या भविष्याची कुठलीही चिंता नाही असा आरोप मोदींनी केला. सपा, बसपा आणि आरएलडी ही संधीसाधूंची आघाडी आहे. यांना असहाय्य सरकार हवे आहे. कारण जात, पात जपना जनता का माल अपना हा त्यांचा मंत्र आहे असे मोदी म्हणाले.