नवी दिल्ली: कुठल्याही राज्यात आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव आम आदमी पक्षाने फेटाळला असल्याचे या पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले. पंजाबमध्ये आमचे चार खासदार आणि २० आमदार आहेत, पण काँग्रेस एकही जागा आम्हाला द्यायला तयार नाही. चंदिगडमध्ये आम्हाला १.३० लाख मते मिळाली होती, मात्र ते आम्हाला एकही जागा देत नाहीत. गोव्यात आमच्या पक्षाला ६ टक्के मिळूनही तेथेसुद्धा एकही जागा देण्यात आली नाही. दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्वच नाही, पण तरीही ते आम्हाला केवळ तीन जागा देऊ इच्छितात, असे सिंह यांनी सांगितले. ही परिस्थिती लक्षात घेता, ‘आप’ने काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला असून, यापुढे काँग्रेसशी चर्चा केली जाणार नाही, असे सिंह म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 2:19 am