News Flash

निवडणूक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला दिल्या सूचना, म्हणाले…

तृणमूल काँग्रेसने तक्रार केल्यानंतर घेतला निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालसह चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आयोगाकडे तक्रार केली की, पंतप्रधान मोदी प्रसिद्धीसाठी लसीकरण प्रमाणपत्रांवर आपली प्रतिमा वापरु शकत नाहीत.

तृणमूल काँग्रेसकडून तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान असलेल्या राज्यांमधून लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून घेण्यास सांगितले आहे. आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान संहितेच्या तरतुदींचे पालन कराण्यास बजावले आहे. हे आदेश सर्व राज्यात लागू होतील असेही त्यांनी सांगितले आहे.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात आयोगाने मतदान संहितेच्या काही तरतुदींचा उल्लेख केला आहे. ज्यात सरकारी खर्चाने बनवलेल्या जाहिरातींचा वापर करण्यास बंदी आहे, असे नमूद केले आहे. पीटीआयने पुढे असे वृत्त दिले आहे की, निवडणूक आयोगाने कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा संदर्भ दिलेला नाही परंतु आरोग्य मंत्रालयाला आगामी विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

अहवालात असे सुचविण्यात आले आहे की आयोगाच्या सूचनेचे पालन करून आरोग्य मंत्रालयाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमधील लसीकरण प्रमाणपत्रांवरून पंतप्रधान मोदींची छायाचित्रे काढून घ्यावी लागू शकतात.

टीएमसीने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील प्रतिमेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:58 pm

Web Title: election commission asks health ministry to remove pm modis photo from vaccine certificates sbi 84
Next Stories
1 १४ वर्षाच्या मुलावर बलात्कार करणाऱ्या महिलेला झाली गर्भधारणा; बाळाला देणार जन्म
2 आता मी स्वस्त राहिले नाहीये; आयकरच्या कारवाईवर तापसीने दिलं उत्तर
3 पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; सहा भाजपा कार्यकर्ते गंभीर जखमी
Just Now!
X