News Flash

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकनंतर नमो टिव्हीवरही निवडणूक आयोगाची बंदी

आयोगाकडे एनटीआर लक्ष्मी, पीएम नरेंद्र मोदी आणि उदयामा सिंहम यांसह इतर काही चित्रपटांबाबत तक्रार आली होती.

निवडणुकांच्या दरम्यान प्रदर्शित होणाऱा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपट पीएम नरेंद्र मोदीच्या प्रदर्शनासह आता नमो टिव्हीवरही निवडणूक काळात बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.

आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, बायोपिकवर बंदी घालण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश नमो टिव्हीसाठीही लागू होतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान या चॅनेलचे प्रसारण रोखण्यात येणार आहे.

आयोगाकडे एनटीआर लक्ष्मी, पीएम नरेंद्र मोदी आणि उदयामा सिंहम यांसह इतर काही चित्रपटांबाबत तक्रार आली होती. यामध्ये एक उमेदवाराला किंवा एका राजकीय पक्षाला निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. हे चित्रपट जर प्रदर्शित झाले तर ते निवडणूकीवर परिणाम करु शकतात, त्यामुळे ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2019 9:15 pm

Web Title: election commission ban on namo tv after pm modis biopic
Next Stories
1 …तर निम्मी काँग्रेस, राष्ट्रवादी शिल्लक राहिली नसती : फडणवीस
2 भाजपा-शिवसेना मेळाव्यात राडा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना धक्काबुक्की
3 गडचिरोलीत मतदानाच्या पूर्वसंध्येला नक्षलवाद्यांकडून स्फोट, एक जवान जखमी
Just Now!
X