कैनाडमधील चंदा विक्रम घोरखाना हिचे धाडस

डहाणू : कैनाड ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून कोसबाड गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी मान्य होत नसल्याने सातत्याने विविध निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची कोसबाड गावाची परंपरा कैनाडमधील चंदा विक्रम घोरखाना हिने मतदान करून मोडीत काढली.

कोसबाड गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोसबाड मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही. त्यामुळे चंदा हिने डहाणू विधानसभा मतदार संघातील कोसबाड केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पंचायत समिती ते लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची परंपरा कैनाडमधील परंपरा पूर्वापार आहे. परंतु चंदा हिने गावची परंपरा मोडीत काढीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.