सतराव्या लोकसभेमध्ये मुस्लीम खासदारांच्या संख्येमध्ये अल्प वाढ झाली आहे. नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यावेळी देशभरातून एकूण २७ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. मावळत्या लोकसभेमध्ये मुस्लीम खासदारांची संख्या २३ होती. बहुतांश मुस्लीम खासदार काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसचे होते.

१९८० साली लोकसभेमध्ये मुस्लीम खासदारांची संख्या सर्वाधिक होती. त्यावेळी देशभरातून ४९ मुस्लीम खासदार निवडून लोकसभेमध्ये गेले होते. २०१४ प्रमाणे भारतीय जनता पार्टीने आताही पूर्ण बहुमत मिळवले आहे. देशभरातून त्यांचे सर्वाधिक ३०३ खासदार निवडून आले आहेत. पण त्यामध्ये एकही मुस्लीम खासदार नाही.

prakash javadekar kerala lok sabha marathi news
केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास
Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली

भाजपाने यावेळी काश्मीरमधून तीन, पश्चिम बंगालमध्ये दोन आणि लक्षद्वीपमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी दिली होती. पण त्यांच्या सहाही मुस्लीम उमेदवारांचा पराभव झाला. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात मोठया प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या आहे. यावेळी उत्तर प्रदेशातून सहा मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत.

२०१४ साली उत्तर प्रदेशातून एकही मुस्लीम उमेदवार विजय मिळवू शकला नव्हता. गाझीपूरमधून बसपाचे अफझल अन्सारी, सहारनपूरमधून फझलूर रहमान अमरोहामधून दानिश अली, रामपूरमधून समाजवादी पार्टीचे आझम खान, संभालमधून शफीक रहमान आणि मोरादाबादमधून एसटी हसन विजयी ठरले आहेत. उत्तर प्रदेशातून काँग्रेसने उभे केलेले सहाही मुस्लीम उमेदवार पराभूत झाले.