29 September 2020

News Flash

२०१४ लाट असेल तर २०१९ मोदी त्सुनामी आहे – देवेंद्र फडणवीस

सत्ता बनवण्यासाठी कोल्हे, लांडगे, पोपट एकत्र आले. सिंहावर आरोप केले. पण आता वाघ-सिंह एकत्र आले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

संग्रहित छायाचित्र

सत्ता बनवण्यासाठी कोल्हे, लांडगे, पोपट एकत्र आले. सिंहावर आरोप केले. पण आता वाघ-सिंह एकत्र आले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. २०१४ ची निवडणूक पंतप्रधान मोदी तुमच्या नावावर जिंकलो होतो. २०१९ ची निवडणूक पंतप्रधान मोदी तुमच्या कामावर जिंकणार आहोत. २०१४ लाट असेल तर २०१९ त्सुनामी आहे असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी ५६ पक्षाच्या आघाडीला पराभूत करु. प्रधानमंत्री आवास योजनेत घर देण्यासाठी २०११ पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना पात्र ठरवलं असे फडणवीस म्हणाले.

ही निवडणूक विकासाची आणि राष्ट्रीय सुरक्षेची आहे. केंद्राने मुंबईच्या विकास प्रकल्पांसाठी तात्काळ मंजुरी मिळवून दिल्या आणि निधी उपलब्ध करुन दिला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 8:26 pm

Web Title: maharashtra cm devendra fadnavis slam congress ncp
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे सुपूत्र अनंत अंबानी उपस्थित
2 गरीबीच्या नावाखाली मते मागणे मान्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 शिर्डीकर म्हणतात देशात पुन्हा एकदा येणार मोदींचीच सत्ता
Just Now!
X