महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये एका नवा ट्रेंड आणला आहे. राज ठाकरे भाषणा दरम्यान मोदींचे जुने व्हिडिओ प्ले करुन दाखवतात. ज्यामध्ये मोदींनी सत्तेवर येण्याआधी पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने आणि आताची परिस्थिती यामधील फरक पुराव्यासकट ते जनतेसमोर मांडतात. राज यांच्या भाषणाची ही नवी पद्धत जनतेला प्रचंड भावली आहे. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकऱ्यांना चांगलेच पसंत पडले आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. या शब्दांची सोशल नेटवर्किंगवर बरीच चर्चा आहे.

राज ठाकरे भर सभेमध्ये हा जो व्हिडिओ प्ले करतात त्यामध्ये सुजीत गिरकर या तरुणाची महत्वाची भूमिका आहे. हे व्हिडिओ तयार करण्यामध्ये सुजीत गिरकर आणि त्याच्या टीमची महत्वाची भूमिका असते. आमच्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला तेव्हा त्याने कल्याण आणि डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सरकारचा कारभार जनतेसमोर आणला होता.

यंदा लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभेत देखील सरकारने जो कारभार करत आहे. त्याचा भांडाफोड राज ठाकरे करीत आहे. त्याला राज्यातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे लक्षात घेता भविष्यात होणार्‍या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून अशाच प्रकारे सभा होतील असे त्याने सांगितले. जनतेचा प्रतिसाद पाहून एक समाधान मिळते. मी राज ठाकरे यांच्या सोबत अनेक वर्षापासून काम करीत आहे. असे सुजितने सांगितले.