पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळयाला आज देश-विदेशातून हजारो पाहुणे उपस्थित रहाणार आहेत. शपथविधी सोहळयाची राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरु आहे. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवनात काही खास पाहुण्यांसाठी पंचपक्वानाचा मेन्यू ठेवण्यात आला आहे. रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का हे खाद्य पदार्थ मेन्यूमध्ये आहेत.

राष्ट्रपती भवनातील प्रांगणात शपथविधी सोहळयासाठी उपस्थित रहाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर ४० विशेष पाहुण्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डिनरचे आयोजन केले आहे. शपथविधी सोहळयाला उपस्थित रहाणाऱ्या पाहुण्यासाठी समोसा, राजभोग, पनीर, चहा आणि कॉफीचा मेन्यू असेल.

भारतातील सर्व राज्यांमध्ये पाकशास्त्राची परंपरा आहे. प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थाचा रात्रीच्या भोजनामध्ये समावेश असेल. पंतप्रधान मोदी या भोजन समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. राष्ट्रपती भवनातील डिनरमध्ये शाकाहारी आणि मांसाहरी अन्न पदार्थांचा समावेश असेल. फिश, चिकन, मटन, डाल रायसिना, काश्मिरी रोगन जोश, आवाधी बिर्यानी, अमृतसरी फिश टिक्का या खाद्यपदार्थांचा डिनरमध्ये समावेश असेल.