News Flash

VIDEO: ‘चुनाव का महिना राफेल करे शोर..’; आव्हाडांची मोदी सरकारवर गाण्यातून टिका

आव्हाड हातात गिटार घेऊन या व्हिडिओत गाणे गाताना दिसत आहेत

मोदी आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टिका केली आहे. मात्र या वेळेस आव्हाड यांनी एका गाण्याच्या माध्यमातून पंतप्रधानां लक्ष्य केले आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला आहे. ‘सावन का महिना पवन करे शोर’ या मिलन सिनेमातील गाण्याच्या चालीवर आव्हाडांनी ‘चुनाव का महिना’ हे गाणे गायले आहे.

राफेल प्रकरणावरुन आव्हाड यांनी एकदम फिल्मी स्टाइलमध्ये टिका केली आहे. मूळ गाण्यातील शब्दांमध्ये बदल करत त्यांनी हे गाणे रचल्याचे आव्हाड हातात गिटार घेऊन या व्हिडिओत सांगताना दिसतात. गाण्याच्या पहिल्या कडव्यामध्ये मोदी सरकारवर राफेल मुद्द्यावरुन टिका केली आहे. या कडव्यात आव्हाड म्हणतात

‘चुनाव का महिना राफेल करे शोर.. पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…
अनिल को तुमने देखो काँन्ट्रॅक्ट दिलाया.. भारत की जनता को मूर्ख बनाया…
अब चाहे जीतने मारो तुम सिक्स और फोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…’

तर दुसऱ्या कडव्यामध्ये आव्हाडांनी मोदी यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तानमध्ये जाऊ दिलेल्या भेटीवरुन टोला लगावला आहे. या कडव्यात ते म्हणातात

‘नवाज के घर मे तुमने बिर्याणी खाई… हमने हमेशा उनसे दुश्मनी निभाई…
अब चाहे जितना मचाओ तू जोर से शोर… पुरी दुनिया बोले भाई चौकीदार है चोर…’

शेवटच्या कडव्यामध्ये आव्हाडांनी नोटबंदीवरुन मोदींना लक्ष्य केले आहे. शेवटच्या कडव्यात ते म्हणतात..

चौदा को तुमने बोहोत भाषण दिलवाये… पाच साल मे लेकिन तुमने किसे कटवाऐ…
वी डोन्ट हॅव मनी, मिस्टर मोदी एनी मोर… डोन्ट चीट अस मोदी वीआर नोट फूल्स एनीमोर…’

या व्हिडीओखालील कमेंटमध्ये अनेकांनी आव्हाड यांच्यावर टिका केली असून काहीजणांनी त्यांचीच मस्करीही केल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 11:36 am

Web Title: ncp leader jitendra awhad sings chunaav ka mahina to criticize pm modi
Next Stories
1 राज ठाकरेंनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम, मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना
2 … तर मोदींनी साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिलीच नसती: ओवेसी
3 BSP ऐवजी चुकून BJP समोरील बटन दाबले, मायावतींच्या कार्यकर्त्याने स्वत:चे बोट कापले
Just Now!
X