बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. अक्षयने पंतप्रधानांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर अक्षयच्या काही प्रश्नांवर मोदी खळखळून हसतानाही पाहायला मिळत आहेत. यावेळी अक्षयने निवृत्तीनंतर तुमचा प्लॅन काय असेल असा विचारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. एकदा अटलजी, अडवाणीजी, प्रमोद महाजन यांच्यासोबत एक बैठक होती. या बैठकीत सर्वांत कमी वयाचा मीच होतो. बैठक सुरू होण्यापूर्वी सगळे मिळून सहज गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सगळेजण आपापले विचार सांगत होते. प्रमोदजींचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ते सतत लोकांशी स्वत:ला जोडून ठेवायचे. मला विचारलं तर मी म्हणालो, मला यातलं काही जमतंच नाही. मी कधी याबद्दल विचारच केला नाही. ज्या ज्या वेळी माझ्यावर जी काही जबाबदारी आली, त्यालाच मी आयुष्य मानलंय. स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी काही करावं लागेल याची मी कल्पनाच केली नाही. म्हणूनच माझ्या मनात कधी निवृत्तीविषयी विचार आला नाही किंवा मी कधी त्याबद्दल विचारच करत नाही. पण आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या सत्कार्यातच घालवेन यावर मला पूर्ण विश्वास आहे,’ असं मोदींनी सांगितलं.

या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on his retirement plan in interview with akshay kumar
First published on: 24-04-2019 at 10:45 IST