19 January 2020

News Flash

भारतीय जनतेनं या फकिराची झोळी भरली – मोदी

आजचा विजय भाजपाचा नव्हे हा विजय भारताचा, लोकशाही आणि जनतेचा विजय आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय जनतेनं या फिकीराची झोळी भरली अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. १२ व्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला मिळलेल्या बहुमतानंतर मोदी संबोदित करत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेचे आभार मानले. भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीसाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं आहे, जे जखमी झालेत त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझी सहवेदना प्रकट करतो, असे मोदी म्हणाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होतो. देशातील कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली आहे. मी भारताच्या १३० कोटी नागरिकांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो, आजचा हा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. कोणी विजयी झालं आहे तर तो भारत देश, भारताची लोकशाही विजयी झाली आहे. त्यामुळे आजचा विजय जनतेला समर्पित करतो, असे मोदी म्हणाले.

भाषणादरम्यान मोदी यांनी निवडणूक आयोगाचे आभारही मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दलांना, ही निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आज दिवसभर मी व्यस्त होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकाल मला पाहता आला नाही. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून मी निकालाविषयीची माहिती घेतली. निकालासंबधीची सविस्तर माहिती, आकलन आणि विश्लेषण लवकरच करेल. यंदाच्या लोकसभेमधील मतदानाचा आकडा आतापर्यंतच्या लोकशाहीतील सर्वात मोठा आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झाले असे मोदी म्हणाले.

First Published on May 23, 2019 8:04 pm

Web Title: prime minister narendra modi addresses party workers at the bjp headquarters
Next Stories
1 ‘या पराभवाचा नक्की विचार करू’; शरद पवार यांची कबुली
2 धक्कादायक ! राजू शेट्टींचा पराभव
3 योगींनी गोरखपूरचा गड राखला, अभिनेते रवी किशन विजयी
Just Now!
X