26 September 2020

News Flash

स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही व मॉनिटरची चोरी, काँग्रेसची तक्रार

साहित्य चोरी होऊन १२ दिवस झाले तरी पोलीस किंवा निवडणूक शाखेकडेअधिकृत तक्रार  न केल्याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केले आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील मतदार सुरक्षा केंद्रातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मॉनिटर चोरीला गेले असून याची तक्रार या मतदार संघातील काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी  राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. विशेष म्हणजे, हे साहित्य चोरी होऊन १२ दिवस झाले तरी पोलीस किंवा निवडणूक शाखेकडेअधिकृत तक्रार  न केल्याबद्दल गजभिये यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

उमरेड विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रासाठी उमरेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तात्पुरते सुरक्षा केंद्र (स्ट्राँग रुम) तयार करण्यात आले होते. यात या मतदारसंघातील सर्व ईव्हीएम ठेवण्यात आले होत्या. याचा तपशील डीव्हीआरमध्ये होता व त्यावर सीसीटीव्हीची निगराणी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. निवडणूक शाखेचे अधिकारी तेथे होते. असे असताना डीव्हीआर आणि मॉनिटर चोरी होणे धक्कादायक आहे. चोरी नंतर १२ दिवस याची वाच्यता तेथील सहायक निडवणूक अधिकाऱ्याने केली नाही. हे आश्चर्यकारक आहे. याबाबत सविस्तर तक्रार महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गजभिये यांनी केली आहे. केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याचे काम स्थानिक एजंसीला देण्यात आले होते. माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असणाऱ्यांनीच हे कृत्य केले अशल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:45 pm

Web Title: ramtek cctv camera monitor stolen strong room alleges congress
Next Stories
1 प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी भाजपामध्ये केला प्रवेश
2 नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला
3 तरूण म्हणतात पार्थ पवारांना संधी द्यायला हवी, ग्रामस्थांचा कल बारणेंच्या दिशेने
Just Now!
X