केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी LDF, काँग्रेसप्रणीत UDF आणि भाजपाप्रणीत NDA या तीन प्रमुख धुरंधरांमध्ये केरळ विधानसभेचा सामना रंगणार असून त्यासाठी तिन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तर, मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना भाजपानं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत अधिकच रंगत भरली गेली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) केरळमध्ये ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांच्यासाठी प्रचार करताना पिनरायी विजयन सरकारवर टीका केली, केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट(एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावं वेगळी आहेत आणि दोन्ही आघाड्यांमधील मॅच फिक्सिंग हे केरळच्या राजकारणातील सर्वात वाईट रहस्य आहे. असं मोदी म्हणाले.

तसेच, एलडीएफवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदींनी गोल्ड स्मगलिंग स्कॅन्डलचा उल्लेख केला. ज्यामध्ये मुख्यमंत्री पिनारायी विजयनच्या कार्यालयावर देखील आरोप झाले होते. “जूडासने चांदीच्या काही नाण्यांसाठी लॉर्ड क्राइस्टचा विश्वासघात केला होता… तशाचप्रकारे एलडीएफने देखील सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळला धोका दिला.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पल्लकड येथे एका प्रचार रॅलीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “अनेक वर्षांपर्यंत केरळच्या राजकारणाचं सर्वात वाईट रहस्य हेच आहे राहिले आहे की, यूडीएफ आणि एलटीएफ यांच्यात मैत्रीपूर्ण करार होता…आता, पहिल्यांदा केरळमध्ये मतदार विचार आहेत – ही काय मॅच फिक्सिंग आहे? एकजण पाच वर्षांपर्यंत लुटतो, त्यानंतर दुसरा पाच वर्षे लुटतो. दोन्ही आघाड्यांनी पैसे कमवण्यासाठी विविध भाग बनवून ठेवले आहेत. यूडीएफने तर सुर्याच्या किरणांना देखील सोडलं नाही.”

“भाजपानं लोकशाही विकायला काढली, पण काँग्रेसनं तर…”, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दोन्ही पक्षांवर घणाघात!

भाजपाने पलक्कडमध्ये ई. श्रीधरन यांना उमेदवारी दिली आहे. मागील काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. केरळमधील एमओएस भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली आहे.

तर, केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असं श्रीधरन भाजपात प्रवेश करण्याअगोदरच म्हणाले होते.