राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून १० दिवस झाले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थान विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पहिल्या यादीत विद्यमान सात खासदारांना संधी देण्यात आली आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर भाजपामधील अनेक नेते नाराजी व्यक्त करीत आहेत. अनेकांना तिकीट नाकारले गेल्यामुळे पक्षात अस्वस्थतता वाढत आहे. असंतुष्ट नेत्यांमध्ये वरिष्ठ नेते, माजी आमदार यांचा समावेश आहे. हे नेते माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.

उदाहरणार्थ- सांचौर विधानसभा मतदारसंघासाठी जालोर-सिरोही लोकसभेचे विद्यमान खासदार देवजी पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. देवजी पटेल यांच्या उमेदवारीला मतदारसंघातील लोकांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. पटेल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Pratibha Dhanorkar
चंद्रपूर : बंदव्दार चर्चेत काय ठरले? आमदार प्रतिभा धानोरकरांनी घेतली नाराज विजय वडेट्टीवारांची भेट

पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपाने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. राजस्थानमध्ये मागच्या ३० वर्षांत कोणत्याही पक्षाला सलग दोनदा सत्ता राखता आलेली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, याची जाणीव भाजपा पक्षश्रेष्ठींना आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक नुकसान करण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखण्यात येत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे वारंवार राज्याचा दौरा करीत असून, विविध घटकांतील पक्षाचे नेते हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मॅरेथॉन बैठका घेत आहेत. तसेच तिकीटवाटपामुळे निर्माण झालेली नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर अनेक नेत्यांचा डोळा असल्यामुळे राज्यातील नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची जाणीव भाजपाला आहे.

सोमवारी (१६ ऑक्टोबर) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उदयपूरचा दौरा करून, या भागातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी व वसुंधराराजे उपस्थित होत्या. “पक्ष आहे म्हणून आपली ओळख आहे. नेत्यामुळे पक्षाला ओळख मिळत नाही”, असे विधान जे. पी. नड्डा यांनी भाषणातून केले असल्याचे भाजपाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून नड्डा यांनी राजस्थानमधील नेत्यांना स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षासाठी काम करावे, असा संदेश दिला असल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवारी (१७ ऑक्टोबर) जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिल्ली येथे राज्यातील प्रमुख नेते, राजस्थानमधील केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, सी. पी. जोशी, वसुंधराराजे, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची बैठक घेतली. दुसर्‍याच दिवशी बुधवारी (१८ ऑक्टोबर) जे. पी. नड्डा हे राजस्थानमध्ये पोहोचले आणि त्यांनी कोटा व अजमेर या भागांतील मतदारसंघांच्या आढावा बैठका घेऊन, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसवर तिखट टीका केली. राजे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोटा प्रांतामधील सर्वच्या सर्व १७ जागा भाजपा जिंकेल, अशी अपेक्षा नड्डा यांनी व्यक्त केली.

नाराज नेत्यांना शांत करणे आणि पक्षाचे संभाव्य निवडणुकीतील नुकसान टाळणे हे नड्डा यांच्या राजस्थानमध्ये वाढलेल्या फेऱ्यांचे उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे.