लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत आता तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठीचा प्रचार सुरु आहे. कोल्हापूर येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार ही बाब दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना जेव्हा महाविकास आघाडीने तिकिट दिलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. “वर्षाताई माझं मत तुलाच” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुनच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मुंबईत २६ जुलैचा पूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून उद्धव ठाकरे कुटुंबासह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले होते.” हा प्रसंग त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. तसंच बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Chhagan Bhujbal Said This Thing About Mahatma Phule
Chhagan Bhujbal : “महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, त्यांनी…” छगन भुजबळ यांचं महत्त्वाचं वक्तव्य
nagpur bhaskar jadhav
“लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’

बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील-मुख्यमंत्री

“बाळासाहेब म्हणाले होते शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ माझ्यावर आली तर दुकान बंद करेन. आज त्यांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार आहे. या देशाचं आणि राज्याचं हे दुर्दैव आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. हे पाऊल उचलल्याने बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील. ज्या गोष्टींचा खेद वाटला पाहिजे त्या अभिमानाने सांगत आहेत.” असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

हे पण वाचा- “पंतप्रधान मोदी विश्वनेते, कुणीही नाद करायचा नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

उद्धव ठाकरेंना हिंदू शब्द उच्चारण्याचीही लाज वाटू लागली आहे

“आता त्यांना (उद्धव ठाकरे) हिंदू हा शब्द उच्चारण्याचीही लाज वाटू लागली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे म्हणायला त्यांची जीभ कचरते. उबाठाची आता काँग्रेस झाली आहे. त्यामुळेच आपल्याला देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींसारखा कर्तृत्ववान नेता निवडायचा आहे. देशात उष्मा वाढला की विदेशात पळणारा नेता (राहुल गांधी) आपल्याला नको.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली.