कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झालेले आहेत. काँग्रेसचा मोठा विजय आणि डबल इंजिन सरकारची जाहिरात करूनही भाजपाला मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचा निकाल आणखी काही दिवस चर्चेत राहणार आहे. या निकालाच्या आकडेवारीतील आणखी एक बाब समोर आली आहे. कर्नाटकमध्ये २२४ पैकी ५२ मतदारसंघ असे आहेत, ज्या ठिकाणी महिला मतदारांची संख्या ही पुरुषांपेक्षाही अधिक नोंदविण्यात आली आहे. या मतदारसंघांमधून काँग्रेसला चांगला लाभ झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. २०१८ च्या निकालाची तुलना केल्यास भाजपा आणि जेडीएसला काँग्रेसच्या तुलनेत खूपच कमी यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणूक २०२३ च्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, दक्षिण कर्नाटकात १९, कर्नाटक किनारपट्टी १६, मध्य कर्नाटक ७, बंगळुरू शहर ६ आणि हैदराबाद कर्नाटक ४ अशा ५२ मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. या ५२ मतदारसंघांपैकी काँग्रेसने २८ मतदारसंघांत विजय प्राप्त केला आहे. तर भाजपाने १८ जागांवर विजय संपादन केला. जेडीएसला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एक जागा सर्वोदय कर्नाटक पक्षाने जिंकली आहे.

Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Ramtek Lok Sabha seat, rasmi barve Caste Certificate, Caste Certificate Controversy, raju parve Nomination Displeasure, favours congress, Challenges Shiv Sena, eknath shinde shivsena, lok sabha 2024, politics news, election news, marathi news
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
triangular fight between bjp vanchit and congress in akola
अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?

हे वाचा >> Karnataka Election : कर्नाटकातील अर्ध्याहून अधिक जागांवर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षाही जास्त!

कर्नाटक विधानसभा २०१८ आणि २०२३ च्या निकालात अनेक विसंगती आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने याच महिलाबहुल मतदारसंघांतून २९ ठिकाणी विजय मिळवला होता. तर काँग्रेसने १४ आणि जेडीएसने ९ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने जिंकलेल्या २८ जागांपैकी १३ जागा या दक्षिण कर्नाटकातील आहेत. त्यानंतर किनारपट्टीलगतच्या सहा, मध्य कर्नाटकमधून चार, हैदराबाद कर्नाटकमधून तीन आणि बंगळुरू शहरातून दोन जागी विजय मिळवला. जेडीएसने पाचपैकी चार जागा दक्षिण कर्नाटक आणि एक जागा हैदराबाद कर्नाटक येथून जिंकली.

सर्वाधिक महिला मतदार कुठे?

बैंदूर या मतदारसंघात महिला आणि पुरुष मतदारांमधील तफावत सर्वाधिक आहे. या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या ९७ हजार ९६१ आहे, तर पुरुष मतदारांची संख्या ८५ हजार ५१७ आहे. दोघांमधील फरक १२ हजार ४४४ आहे. या मतदारसंघात भाजपाच्या गुरुराज शेट्टी यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेस उमेदवार के गोपाल पुजारी यांचा १६ हजार १५३ मतांनी पराभव केला.

महिला मतदारांची संख्या अधिक असणारे मतदारसंघ

महिला मतदार मोठ्या संख्येने असलेले ५२ मतदारसंघ पुढीलप्रमाणे.. बंतवळ, बेळ्ळारी, बेळ्ळारी शहर, बेलतानगडी, भद्रावती, भटकळ, बैंदूर, चामराज, चामराजनगर, चन्नपटना, चिक्कबळ्ळपूर, चिकमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे उत्तर, गुंडुलपेट, गुरमितकल, हासन, होसाकोटे, कनकपुरा, कापु, करकळ, कारवार, कृष्णराज, कृष्णराजपेट, कुंदापूर, मद्दुर, मडिकेरी, महालक्ष्मी लेआउट, मल्लेश्वरम, मंड्या, मंगळूर, मंगळूर शहर उत्तर, मंगळूर शहर दक्षिण, मेळूकोटे, मूडबिदरी, मुदीगेरे, नरसिंहराज, पुलकेशीनगर, पुट्टुर, राज राजेश्वरी नगर, शांतीनगर, शिमोगा, श्रवणबेळगोळ, शृंगेरी, श्रीरंगपट्टण, तिप्तूर, तीर्थहळ्ळी, तुमकुर शहर, उडुपी, विजय नगर, विराजपेट आणि यशवंतपूर.

संपूर्ण राज्याचा विचार करता पुरुष मतदारांनी महिला मतदारांपेक्षा अधिक प्रमाणात मतदान केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी झालेल्या मतदानाप्रसंगी राज्यातील १.९६ कोटी पुरुष मतदारांनी मतदान केले, तर महिला मतदारांची संख्या १.९१ कोटी एवढी आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण काढायचे झाल्यास पुरुष मतदारांचे प्रमाण ७३.६८ टक्के आहे, तर महिलांचे प्रमाण ७२.७० टक्के एवढे आहे.