देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार राज्यातील कौल समोर येत आहेत. मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजताच सुरू झाली असून सायंकाळपर्यंत अनेक राज्यातील चित्र स्पष्ट होऊ शकेल. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने कमालीची आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपाने आघाडी घेतली आहे. तर, मध्य प्रदेशात भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने आहे. तसंच, छत्तीसगडमध्येही फासे पालटले असून भाजपाची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफांनी राष्ट्रवादीचा पायगुण असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा >> “मोदींची जादू कायम आहे का? हे आपल्याला…”, निवडणूक निकालांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. गेल्यावर्षी सगळीकडे भाजपाचा पराभव झाला होता. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा पायगुण असावा”, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापुरातील कागल येथे बोलत होते.

कोण कुठे आघाडीवर?

छत्तीसगड

भाजपा – ५३, काँग्रेस ३४, जीजीपी १, बीएसपी १, सीपीआय १

मध्य प्रदेश

भाजपा – १६१, काँग्रेस ६६, बीएसपी २, अन्य १

राजस्थान

भाजपा ११२, काँग्रेस ७१, आयएनडी ९, बीएसपी २, अन्य २

तेलंगणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस ६५, बीएचआरएस ३९, भाजपा ९, एआयएमआयएम ५, सीपीआय १,